Mahaparinirvan Din महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर राज्यपाल कोश्यारी जनतेला संबोधित करताना म्हणाले

Mahaparinirvan Din महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर राज्यपाल कोश्यारी जनतेला संबोधित करताना म्हणाले

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले आहेत. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी जनतेला संबोधित करताना डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर आजवर आपण चालत आलोय आणि चालत राहू असे आवाहन केले.

हेही वाचा :

शिवशक्ती भीमशक्ती प्रयोगावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

राज्यपाल म्हणाले, डॉ. बाबासाहेबांचं कार्य मोठं आहे. बाबासाहेबांकडून जगण्याची प्रेरणा मिळते, तसेच संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं असं सांगत महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी चैत्यभूमीवरून (Chaityabhoomi) जनतेला संबोधित केले, डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर आजवर आपण चालत आलोय आणि चालत राहू असं राज्यपालांनी जनतेला संबोधित करताना म्हटलंय.

आज दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले आहेत. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Chief Minister Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिनानिमित्त आदरांजली वाहिली.

Dr. Babasaheb Ambedkar महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काही प्रेरणादायी उदाहरणे पहा

बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. या अनुयायांसाठी आज विविध प्रकारच्या सेवा देण्यात आहेत. मोठ्या संख्येने समाजातील दुर्बल घटक आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांसाठी बेस्टने स्वस्त आणि चांगली सेवा देण्याचा निर्णय घेतला. तसेच ४०० जादा दिव्यांची आणि ५० जादा बसेसची व्यवस्था भाविकांसाठी उपलब्ध केली आहे.

मुंबई पोलिसांनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलीस, एसआरपीएफ, बॉम्बशोधक पथक आणि इतर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Mahaparinirvan Din : ६६ व्या महानिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर दाखल

Exit mobile version