Gram Panchayat Election Results 2022 : ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल, सर्व अपडेट्स…

राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा (Maharashtra Gram Panchayat Election Result) आज निकाल आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी ७४ टक्के मतदान झालं होतं.

Gram Panchayat Election Results 2022 : ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल, सर्व अपडेट्स…

राज्यात रविवारी दि. १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा (Maharashtra Gram Panchayat Election Result) आज निकाल आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी ७४ टक्के मतदान झालं होतं. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी ताकद लावली होती. त्यातच ७२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून बाकी ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस कोण बाजी मारणार? याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

पालघर ग्रामपंचायत निकाल अपडेट –
पालघरमध्ये पहिला निकाल आला असून डहाणूतील तणाशी मधील अपक्ष अपर्णा कानात या विजयी झाल्या आहेत.त्यांना २६३ मत मिळाली आहेत.
ठाकरे गट आणि शिंदे गट प्रत्येकी १ ग्रामपंचायत

खराडी ग्रामपंचायत येथे काँग्रेसने खाते उघडले आहे. काँग्रेसच्या आरती संजय हीवसे या विजयी झाल्या.

भिवंडी ग्रामपंचायत निकाल अपडेट –
भिवंडी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने खाते उघडले असून शिरोळे ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. मनसेचे सरपंच तसेच नव सदस्यांपैकी सहा सदस्य देखील मनसेने मिळवले आहे
भाजप – २ , मविआ – १ तर अपक्ष्यांच्या खात्यात ७ जागा

नाशिक ग्रामपंचायत निकाल अपडेट –
– नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात माकपने खाते उघडले असून धोडांबे ग्रामपंचायतमध्ये माया भोये विजयी झाल्या आहेत. तर सरपंचपदी मात्र राष्ट्रवादीचे पुंडलिक पवार विजयी झाले आहेत. तर तालुक्यातीलच उंबरपाडा येथे स्थानिक विकास आघाडीने एंट्री केली असून सरपंचपदी चिमण लक्ष्मण पवार निवडून आले आहेत.
– त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळे ग्रामपंचायतीत शिंदे गटाची सरशी झाली आहे. शिंदे गटाच्या देवचंद पाटील यांचा विजय झाला आहे. तर पेठ – पेठ तालुक्यात चार निकाल हाती आले असून राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. पेठ तालुक्यातील माळेगाव, शिवशेत, पाहुचीबारी आणि आंबे ग्रामपंचायतीवर सरपंच पदी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
– नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. राहुडे ग्रामपंचायतीत शिवसेना तालुका अध्यक्षांच्या सुनबाई सुषमा गांगुर्डे विजयी झाल्या आहेत. सांजोळे ग्रामपंचातीवर माकप चे सीताराम वाघमारे विजयी झाल्या आहेत. तर रोकडपाडा येथे राष्ट्रवादीची सरशी झाली असून संपूर्ण पॅनल निवडून आला आहे. सराड ग्रामपंचायतीवर अपक्ष म्हणून नामदेव भोये विजयी झाले आहेत.
– त्र्यंबक तालुक्यातील रोहिले व माळेगाव ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. रोहिले येथील रतन खोडे यांची सरपंचपदी निवड झाली आहे. तर माळेगाव च्या ग्रामपंचायत सरपंचपदी वंदना गोरख दिवे यांची निवड झाली आहे.
– मनसेच्या स्थापने पासून ताब्यात आलेली बाहुली बुद्रुक ग्रामपंचायत मनसेने जिंकली आहे. बाहुली बुद्रुकच्या सरपंचपदी मनसेचे लक्ष्मण घोडे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेने आपली ग्रामपंचायत राखली आहे.

राजेदहेगाव ग्रामपंचायतचा निकाल घोषित, अपक्ष उमेदवार स्वाती रत्नदीप हुमने विजयी

वांगणीत भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने खातं उघडलं आहे. प्रभाग एक मधून भाजपच्या दीपाली कांबरी विजयी तर प्रभाग दोन मधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ईश्वर शेलार विजयी झाले आहे. १७ जागांसाठी ६६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर थेट सरपंचपदासाठी ५ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे,

रत्नागिरी ग्रामपंचायत निकाल अपडेट –
– रत्नागिरीतील गुहागर तालुक्यात आमदार भास्कर जाधव यांचं वर्चस्व, दोन्ही ग्रामपंचायतीवर ठाकरे गट विजयी झाले आहेत. गुहागर तालुक्यातील वेलदूर ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटाचा सरपंच, दिव्या वणकर सरपंच पदी विजयी झाले आहेत. अंजवेल ग्रामपंचायतीवर सरपंचपदी सोनल मोरे विजयी झाल्या आहेत.
– कोरपना तालुक्यातील नांदा ही महत्त्वाची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात.. भाजपचे सरपंचांसह १५ सदस्य निवडून आले तर कॉंग्रेसचे तीन सदस्य निवडून आले आहेत.
– रत्नागिरी जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व.
– शिंदे गट पाच, भाजप एक, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि गाव पॅनलची सहा ग्रामपंचायतींवर सत्ता.
– रत्नागिरी- ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला… तब्बल २४ ग्रामपंचायतींवर उद्धव ठाकरे गटाची सत्ता तर शिंदे गटाला केवळ सात ग्रामपंचायतींमध्ये यश मिळवले आहे. गाव पॅनलच्या १७ ग्रांमपंचायती नेमक्या कुणाकडे जाणार याची उत्सुकता आहेय रत्नागिरी, लांजा राजापूर मतदार संघात उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा करिश्मा तर दक्षिण रत्नागिरीत १८ जागांवर उद्धव ठाकरे गटाचा दबदबा

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक (तालुका निहाय ग्रामपंचायत)
रत्नागिरी तालुका
१ – शिरगांव – सरपंच महाविकास आघाडी
२ – फणसोप – ठाकरे गट
३ – चरवेली – गाव पॅनल (बिनविरोध)
४ – पोमेंडी बुद्रुक – ठाकरे गट

लांजा तालुका
१ – शिरवली – ठाकरे गट ( बिनविरोध )
२ – रिंगणे – गाव पॅनल
३ – कोचरी – ठाकरे गट (बिनविरोध)
४ – गवाणे – ठाकरे गट
५ – वेरवली – ठाकरे गट
६ – देवधे – ठाकरे गट
७ – कोर्ले – गाव पॅनल
८ – गोवीळ – राष्ट्रवादी काँग्रेस
९ – प्रभानवल्ली – गाव पॅनल
१० – व्हेळ – राष्ट्रवादी काँग्रेस
११ – कोंड्ये – ठाकरे गट
१२ – झापडे – ठाकरे गट
१३ – उपळे – गाव पॅनल
१४ – हर्चे – ठाकरे गट
१५ – कोलधे – गाव पॅनल

राजापूर तालुका
१ – सागवे – ठाकरे गट
२ – देवाचे गोठणे – गाव पॅनल (बिनविरोध)
३ – वडदहसोळ – ठाकरे गट ( बिनविरोध )
४ – आंगले – ठाकरे गट
५ – भालावली – भाजप
६ – केळवली -ठाकरे गट ( बिनविरोध)
७ – मूर -ठाकरे गट ( बिनविरोध )
८ – राजवाडी – गाव पॅनल
९ – मोगरे – ठाकरे गट ( बिनविरोध )
१० – कोंडये तर्फे सौदळ – ठाकरे गट

संगमेश्वर तालुका
१ – कोंड असुर्डे – ठाकरे गट
२ – आंबेड बुद्रुक – गाव पॅनल
३ – असुर्डे – ठाकरे गट

चिपळूण तालुका
१ – फोपळी – गाव पॅनल ( बिनविरोध )

गुहागर तालुका
१ – अंजनवेल – ठाकरे गट
२ – वेलदूर – ठाकरे गट
३ – वेळंब -गाव पॅनल ( बिनविरोध )
४ – परचुरी – गाव पॅनल ( बिनविरोध )
५ – छिंद्रावळे – गाव पॅनल

खेड तालुका
१ – असगणी – ठाकरे गट
२ – आस्तान – शिंदे गट
३ – नांदगाव – ठाकरे गट
४ – सुसेरी – गाव पॅनल
५ – तळघर – शिंदे गट ( बिनविरोध )
६ – वडगाव – शिंदे गट ( बिनविरोध)
७ – देवघर – शिंदे गट

दापोली तालुका
१ – इनामपांगरी – गाव पॅनल
२ – गावतळे – गाव पॅनल
३ – फणसू – शिंदे गट (( बिनविरोध ))
४ – नवसे – गाव पॅनल (( बिनविरोध ))

मंडणगड तालुका
१ – घराडी – शिंदे गट
२ – निगडी – शिंदे गट

नागपूर ग्रामपंचायत निकाल अपडेट –
– सिरसी ग्रामपंचायत काँग्रेसकडे
– कुही तालुक्यातील देवळीकला ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेस समर्थीत उमेदवार राम येळकर सरपंच पदी विजयी झाले आहे. तसेच कुही तालुक्यातील गोन्हा ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सीमा भोयर विजयी झाल्या आहेत.

नंदुरबार ग्रामपंचायत निकाल अपडेट –
– एकूण ग्रामपंचायत- २०६ ; आतापर्यंतचे निकाल ६३
शिवसेना – ०८
शिंदे गट – ०५
भाजप- २०
राष्ट्रवादी- ०२
काँग्रेस- २२
इतर- ०६
– नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतमध्ये माजी मंत्री के सी पाडवी यांचे वर्चस्व दिसून येत आहे.. नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीला पसंती मिळाली आहे. जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे तर दोन नंबरवर भाजप आहे.

कल्याण ग्रामपंचायत निकाल अपडेट –
– कल्याण तालुक्यातील सात पैकी तीन ग्रामपंचायतीमध्ये भाजप , ठाकरे गट २, राष्ट्रवादी १ तर इतर १ असा निकाल लागला आहे

सरपंच
भाजप – ०३
ठाकरे गट – ०२
शिंदे गट – ००
राष्ट्रवादी -०१
कॉंग्रेस -००
इतर -०१

१ – वाहोली ग्रामपंचायत – ग्रामविकास पॅनलकडून शाहीम सरवले विजयी
२ – केळणी कोलम गट ग्रामपंचायत – भाजपचे राजेश भोईर विजयी
३ – मामनोली ग्रामपंचायत – भाजपचे सुशांत कोर
४ – दहिवली अडीवली ग्रामपंचायत – ठाकरे गटाकडून कमलाकर राऊत विजयी
५ – रुंदे ग्रामपंचायत – भाजप चे नरेश चौधरी
६ – फळेगाव ( बिनविरोध) – राष्ट्रवादी भारती जाधव
७ – उषीद बिनविरोध

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप शिंदे गटाच्या ग्रामविकास आघाडीचं वर्चस्व.. 17 पैकी 12 जागांवर ग्रामविकास युतीचे उमेदवार विजयी तर शिंदे गटातल्याच वामन म्हात्रे प्रणित दुसऱ्या गटाने जिंकल्या चार जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फक्त एक जागा तर काँग्रेस राष्ट्रवादीला खातं उघडण्यातही अपयश आले आहे

भंडारा ग्रामपंचायत निकाल अपडेट –
भंडारा तालुका
१ – खराडी – आरती हिवसे (काँग्रेस)
२ – परसोडी- नंदा वंजारी (अपक्ष)
३ – राजेदहेगाव – स्वाती हुमणे (अपक्ष)
४ – खैरी पुनवर्सन – सलिता गंथाड़े (अपक्ष)
५ – संगम पुनर्वसन – शारदा मेश्राम (अपक्ष)
६ – पिपरी पुनवर्सन- देवीदास ठवकर (शिंदे गट)
७ – भोजपुर – संगीता मेश्राम (काँग्रेस)
८ – केसलवाडा – आशु वंजारी (शिंदे गट)
९ – खामाटा (टाकळी) -रुपाली भेदे (कॉंग्रेस)
१० – सालेबर्डी- समता गजभिये (अपक्ष)
११ – सिरसघाट – पुष्पा उत्तम मेश्राम (अपक्ष)
१२ – टेकेपार – प्रियांका कुंभलकर (अपक्ष)
१३ – तिड्डी- दत्तराम जगनाडे (काँगेस)
१४ – बोरगांव – संजय लांजेवार (राष्ट्रवादी)
१५ – ईटगाव – कविता चौधरी (अपक्ष)
१६ – सुरेवाडा – दीक्षा सुखदेव (अपक्ष)

Exit mobile version