ग्रामपंचायत निवडणूक निकाल; शिंदे गटाला शिवसेनेपेक्षा अधिक जागा; जाणून घ्या निकालात कोणाची बाजी?

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; शिंदे गटाला शिवसेनेपेक्षा अधिक जागा; जाणून घ्या निकालात कोणाची बाजी?

राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election Results 2022) काल, रविवारी मतदान झाले. आज या शेकडो गावांचे गाव कारभारी त्या त्या गावाला मिळणार आहेत. राज्यातील तब्बल ५४७ ग्रामपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. राज्यातील तब्बल ६०८ पैकी ५४७ ग्रामपंचायतीसाठी ७६ टक्के मतदान झालं आहे. तर ६०८ पैकी ६१ जागांवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत सर्व जागांवरील चित्र स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतरानंतर ही पहिलीच निवडणूक (Election) असून १६ जिल्ह्यांतील तब्बल ६०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी मतदान काल पार पडले. त्यामध्ये ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली असून ५४७ ग्रामपंतायतीसाठी मतदान पार पडले. तर आज या निवडणुकांचा गुलाल उधळणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींचे निकाल हाती

भाजप – १९
शिंदे गट – १३
काँग्रेस – ४
राष्ट्रवादी – ०
अपक्ष – ५

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निकाल अपडेट

एकूण ग्रामपंचायत- ८२
शिवसेना – ०२
शिंदे गट – ००
भाजप – ०३
राष्ट्रवादी – १७
काँग्रेस – ०१
माकप – ०३
इतर – ०१

धुळ्यात भाजपचा झेंडा

धुळ्यात भाजपने ३३ पैकी ३२ ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा गुलाल

आंबेगावनंतर जुन्नर तालुक्यातही राष्ट्रवादीने आपला गुलाल उधळला असून आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने तब्बल २९ जागांवर विजय मिळवला आहे.

जळगाव येथील चोपडा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून राष्ट्रवादी आणि शिंदे गट आघाडीवर असून प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना २ तर तीन ग्रामपंचायतींवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे चोपडा तालुक्यात भाजपला एकाही जागेवर विजय मिळवला आला नाही.

शिंदे गटाचा ७६, तर आघाडीचा ६१ ग्रामपंचायतींवर झेंडा

आत्तापर्यंत शिंदे-भाजप गटाने ७६, काँग्रेसने २०, राष्ट्रवादीने ३१, आघाडीने ६१ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा

आंबेगाव तालुक्यात २ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून २ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा भगवा फडकला असून बऱ्याच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी आघाडीवर आहे.

 

हे ही वाचा:

राज ठाकरे पोहोचले नागपुरातील फुटाळा तालाबमधील फाउंटन शो पाहण्यासाठी

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

संजय राऊत यांची आज सुटका होणार कि पुन्हा कोठडी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version