गुजरातमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचासंहिता लागू, ‘या’ दिवशी मतदान होण्याची शक्यता 

गुजरातमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचासंहिता लागू, ‘या’ दिवशी मतदान होण्याची शक्यता 

हिमाचलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून आता गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असताच निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ नोव्हेंबर रोजी निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. यात १ व २ डिसेंबर रोजी पहिला टप्पा आणि ४ किंवा ५ तारखेला दुसरा टप्प्यातील मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबर रोजी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : 

Maharashtra Politics : अजित पवार नशिकात, तर शिंदे गटाच्या मेळाव्याचे नंदुरबार येथे शक्तिप्रदर्शन

मीडिया रिपोर्टनुसार येत्या ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ते भाग घेणार आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात सर्व राज्यातील पोलीस एकत्र येणार असून त्यांची परेड होणार आहे. या कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार आहेत. तसेच जांबुघोडा येथे आदिवासींनाही ते संबोधित करणार आहेत. त्यानंतर मोदी बासनकांठा पाणी योजनेचं लोकार्पण करण्यात येणार आहे. मोदींच्या या कार्यक्रमानंतरच निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी, एसआरए घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

गुजरातमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजप सरकार गुजरातमध्ये सत्ता टिकवण्यासाठी गौरव यात्रा काढत आहे. दुसरीकडे गुजरातच्या भाजप सरकारला आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्ष सज्ज झाला आहे. त्याचबरोबर भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी काँग्रेसही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

गुजरात विधानसभेत एकूण १८२ जागा आहेत. त्यापैकी ४० जागा राखीव आहेत. यापैकी १३ जागा अनुसूचित जातीसाठी तर २७ जागा अनुसूचित जमाती आदिवासी समाजासाठी राखीव आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी काँग्रेसच्या खात्यात ७७ जागा आल्या. याशिवाय भारतीय आदिवासी पक्षाला २ जागांमध्ये १ जागा, राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घणाघात, ”सरकारमध्ये ताळमेळ नाही, उद्योगमंत्र्यांकडून राज्यातील जनतेची दिशाभूल”

Exit mobile version