spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात होणार मतदान

निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गुजरात राज्यातील १८२ जागांच्या विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये सध्या ४ कोटी ९० लाखांहून अधिक मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार यावेळी ५१ हजार ७८२ हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याचदिवशी हिमाचल प्रदेश विधानसभा निकालाचेही निकाल येणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत ४.९ कोटी मतदार असून ४.६ लाख युवा मतदार आहेत. दिव्यांगासाठी १८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ९.८९ लाख वृद्ध नागरिक मतदान करणार आहेत.

हेही वाचा : 

दिल्ली हायकोर्टाने मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची दुसऱ्यांदा याचिका फेटाळली

गुजरातमध्ये किती मतदार आहेत?

गुजरातमध्ये सध्या ४ कोटी ९० लाखांहून अधिक मतदार आहेत. प्रत्येक बुथवर सरासरी ९४८ मतदार आहेत. त्यापैकी १० हजार ४६० मतदार हे १०० वर्षांवरील आहेत. त्याचवेळी नऊ लाख ८७ हजार मतदारांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर चार लाख ६१ हजारांहून अधिक तरुण मतदार आहेत. फक्त महिलांसाठी १२७४ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. गीर जंगलातील केवळ एका मतदारासाठी मतदान केंद्र बांधले जाणार असताना वग्रा येथे एक मतदान केंद्र शिपिंग कंटेनरमध्ये बांधण्यात आले आहे. राज्यात चार लाख चार हजार ८०२ अपंग मतदार आहेत. दिव्यांगांसाठी १८३ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

आप देणार मोठी टक्कर

गुजरात विधानसभेसाठी अरविंद केजरीवा यांच्या आम आदमी पक्षाने भाजपला थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळं गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपच्या एन्ट्रीने समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. केजरीवाल यांनी मोफत वीज, पाणी आणि शिक्षा सारखी आश्वासने दिली आहेत.

Kartiki Ekadashi : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरला विशेष रेल्वे, मात्र परतीच्या पावसामुळे भाविकांनी फिरवली यात्रेकडे पाठ

काँग्रेसची बैठक

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ४ नोव्हेंबरला दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी २९ ऑक्टोबर रोजी दिली होती. चेन्निथला या तीन सदस्यीय निवड समितीच्या अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार?

Latest Posts

Don't Miss