Gujarat Election 2022 : पक्षाविरोधात निवडणूक लढवणाऱ्या आमदारांवर भाजपने केली कारवाई

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ एक आठवडा शिल्लक आहे. निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे त्यात नवे नवे ट्विस्ट समोर येत आहेत.

Gujarat Election 2022 : पक्षाविरोधात निवडणूक लढवणाऱ्या आमदारांवर भाजपने केली कारवाई

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ एक आठवडा शिल्लक आहे. निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे त्यात नवे नवे ट्विस्ट समोर येत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर येत असून राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने आपल्या १२ आमदारांवर कारवाई केली आहे.पक्षाने १२ बंडखोर नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने या बंडखोर आमदारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते.

गुजरातमध्ये (Gujarat) पक्षाविरोधात बंड करणाऱ्या आमदारांवर भाजपने (BJP) मोठी कारवाई केली आहे. राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने आपल्या १२ नेत्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर. पाटील यांनी या प्रकरणी सांगितले की, पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी आमदारांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ज्या आमदारांवर कारवाई करण्यात आली त्यात दिनूभाई पटेल, मधुभाई श्रीवास्तव, कुलदीप सिंग, बी पागी, धवल सिंग झाला, रामसिंग ठाकोर, मानवजीभाई देसाई, एल ठाकोर, एसएम बंत, जेपी पटेल रमेश झाला आणि अमरशी भाई झाला यांचा समावेश आहे.

ऑक्टोबरमध्ये कुलदीप राऊलजी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते आणि आता काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी भाजपने आमदार दिनेश पटेल यांना दोन वेळा आणि सहा वेळा आमदार मधू श्रीवास्तव यांना निलंबित केले आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या विधानसभेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी यापूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला होता. भाजपने पंचमहाल जिल्ह्यातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या खातू पागी यांनाही निलंबित केले आहे, तर महिसागरमधील लुनावाडा येथे एसएम खंत आणि जेपी पटेल यांना पक्षाने निलंबित केले आहे.

विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या ४२ आमदारांचे तिकीट नाकारले आहे. भाजपने १६० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत ३८ विद्यमान आमदारांना तिकीट मिळालेले नाही. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, पाटील यांच्यासह पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी आगामी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हे ही वाचा:

Shivsena : ठाकरे गटातील शिवसेनेच्या महिला नेत्यांत गटबाजी?

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दोन दिवसीय दौरा; लक्ष शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर

रिफायनरीचा मुद्दा पुन्हा तापला! ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं शक्तीप्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version