गुजरात निवडणूक ठरली ‘आप’ साठी फायदेशीर ! जाणून घ्या कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

आम आदमी पक्षाने (AAP) आज राष्ट्रीय पक्ष बनण्याचा दर्जा मिळवला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आज ही माहिती दिली.

गुजरात निवडणूक ठरली ‘आप’ साठी फायदेशीर ! जाणून घ्या कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

आम आदमी पक्षाने (AAP) आज राष्ट्रीय पक्ष बनण्याचा दर्जा मिळवला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आज ही माहिती दिली. केजरीवाल म्हणाले की, गुजरातच्या जनतेने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष (National Party) बनवले आहे. गुजरातमध्ये ‘आप’ला मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार आप आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. अवघ्या १० वर्षात आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्षांमध्ये सामील झाला आहे.

दिल्ली महापालिका निवडणुकांचे निकाल काल लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा आपने मोठा पराभव केला. यामुळे आजच्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत आप काय कमाल करणार याची उत्सुकता लागली आहे. गुजरातमध्ये आपला मोठे यश मिळेल, असा दावा केला जात होता. पण तसंच होताना सध्यातरी दिसत नाहीए. पण आपच्या नेत्यांनी ट्विटमधून गुड न्यूज दिली आहे.

केजरीवाल म्हणाले की, ‘ज्यावेळी मी गुजरातमध्ये गेलो तेव्हा मला खूप प्रेम मिळाले. मी तुम्हा सर्वांचा ऋणी राहीन. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तो गड फोडण्यात आम्ही यशस्वी झालो. गुजरातमध्ये आम्हाला १३ टक्के मते मिळाली आहेत.गुजरातच्या लाखो लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. तुमच्या पाठिंब्याने आम्ही पुढच्या वेळी गड जिंकण्यात यशस्वी होऊ. आम्ही संपूर्ण मोहीम सकारात्मक पद्धतीने चालवली. कोणाला शिवीगाळ केली नाही. फक्त कामाबद्दल बोललो. हेच आम्हाला इतर पक्षांपेक्षा वेगळे ठरवते. आजवर बाकीचे पक्ष धर्म आणि जातीचे राजकारण करत आले आहेत. पक्षाच्या कामावर बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे.

राष्ट्रीय पक्ष बनलेल्या आपची दिल्ली, पंजाब आणि दिल्ली एमसीडीमध्ये सरकार आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचेही गोव्यात दोन आमदार आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने दोन जागा जिंकल्या आणि त्यांना ६.७७ टक्के मते मिळाली. आता गुजरातमध्येही आम आदमी पक्षाला जवळपास १३ टक्के मते मिळाली आहेत. अशाप्रकारे, चार राज्यांमध्ये त्यांच्याकडे ६ टक्क्यांहून अधिक मते झाली आहेत आणि तो ८ वा राष्ट्रीय पक्ष बनला आहे.

देशात किती राष्ट्रीय पक्ष आहेत?

आम आदमी पार्टी हा देशातील ८ वा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे.ज्यात काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे आहेत.

कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाचे काही मापदंड आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो.

१. कुठलाही राजकीय पक्ष ज्याला किमान चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला असेल, अशा राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

२. कुठलाही राजकीय पक्ष जो तीन वेगवेगळी राज्ये मिळून लोकसभेत २ टक्के जागा जिंकतो म्हणजे किमान ११ जागा जिंकतो त्याला हा दर्जा मिळलतो. पण लोकसभेच्या या ११ जागा तीन वेगवेगळ्या राज्यातीलच हव्यात, एका राज्यातील नाही.

३. एखादा राजकीय पक्ष ज्याच्याकडे लोकसभेच्या ४ जागांशिवाय विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये ६ टक्के मतं मिळली असेल, अशा पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

हे ही वाचा : 

Gujarat Election Result 2022 गुजरातमध्ये भाजपचा नवा विक्रम, ५३ टक्के मतांवर कब्जा

गुजरातमध्ये BJPच्या विजयानंतर फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version