spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gujarat, Himachal Election Result 2022 गुजरातमध्ये भाजप १५० जागांवर पुढे, तर हिमाचलमध्ये काँग्रेस देतोय तोडीस तोड स्पर्धा

आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत काही महत्त्वांच्या जागांवरील निवडणूक ही प्रतिष्ठेची समजली जात आहे. एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजप सत्ता कायम राहणार असून हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावरील काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई होणार आहे.

गुजरात विधानसभा निकाल २०२२

अल्पेश ठाकोर गांधीनगर दक्षिणमधून ३३०० मतांनी पुढे

मणिनगरमध्ये भाजप उमेदवार ७३०३ मतांनी आघाडीवर

वडोदरा सिटी मतदारसंघातून भाजप उमेदवार मनिषा वकील चौथ्या फेरीनंतर आघाडीवर

अहमदाबाद असरवामध्ये दोन फेऱ्यानंतर भाजप उमेदवार ८ हजार मतांनी आघाडीवर

हिमाचल प्रदेशातमध्ये भाजपा ३०, काँग्रेस ३६, अपक्ष ०३, आप ००

तीन अपक्षांवर असणार भाजपा आणि काँग्रेसची नजर

सरकार बनवण्यात ३ अपक्षांची भूमिका महत्त्वाची

हिमाचल प्रदेशात एकूण ६८ जागा

हेही वाचा : 

Himachal Pradesh Assembly Election 2022 हिमाचलमध्ये भाजपला काँग्रेसची ‘काँटे की टक्कर’ भाजप ३६ तर काँग्रेस…

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल समोर येत असून, भारतीय जनता पक्षाला (BJP) बहुमत मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल दुसऱ्या फेरीअखेर १३,००० मतांनी आघाडीवर आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये रिवाबा जडेजा जामनगर उत्तर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. रिवाबा भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा याची पत्नी आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी खंभलिया विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

Gujarat Election Result 2022 गुजरातमध्ये भाजपनं शतक गाठलं १२२ तर, काँग्रेस – ४७ व आप – ३ 

गुजरातमधील सुरुवातीच्या कलानुसार भाजप सलग सातव्यांदा सत्ता स्थापन करणार आहे.भाजपने प्रचंड विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आम आदमी पक्ष पहिल्यांदा गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत उतरला होता. ‘आप’ने या निवडणुकीत लक्षणीय मते मिळवली आहेत. त्यामुळे आगामी काळात गुजरातमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रचंड विजयानंतर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. तब्बल सहा जागांनी सध्या काँग्रेस पुढे आहे. हिमाचलमध्ये विधानसभेच्या ६८ जागा आहेत. काँग्रेस ३६, भाजप ३० तर २ ठिकाणी इतर आघाडीवर आहे.

Gujarat Assembly Election 2022 Result गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार, मतमोजणीला सुरुवात, गुजरातमध्ये भाजप ९० जागांवर आघाडी

Latest Posts

Don't Miss