spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gujrat Election पंतप्रधान मोदी व अमित शहा आज मतदानाचा हक्क बजावणार, ९३ जागांवर आठशेच्यावर उमेदवार नशीब आजमावणार

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Elections) दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांतील ९३ विधानसभा जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. त्याचवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे देखील आज मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रियेचा भाग होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या जनतेला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पीएम मोदींनी ट्विट करून म्हटलं की, आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व लोकांनी, विशेषतः तरुण मतदार आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. सकाळी ९ वाजता अहमदाबादमध्ये मतदानासाठी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकरांची आज पुन्हा भेट होणार, युतीचा निर्णयावर शिक्कामोर्तब?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादच्या राणीप भागातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत. तत्पूर्वी, रविवारी (४ डिसेंबर) संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये आई हिराबा यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईसोबत सुमारे ४५ मिनिटे घालवली, त्यानंतर ते भाजप मुख्यालय कमलमला रवाना झाले. येथे अमित शहा, प्रदेश भाजप अध्यक्ष सीआर पाटील आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

या टप्प्यात भाजप सर्व ९३ जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवाय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सर्व ९३ जागांवर लढत आहेत. काँग्रेस ९० जागांवर निवडणूक लढवत असून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाने (BTP) १२ उमेदवार उभे केले आहेत आणि बहुजन समाज पक्षाने (BSP) ४४ उमेदवार उभे केले आहेत.

Datta Jayanti 2022 दत्तजयंतीनिम्मित जाणून घ्या भगवान दत्ताची कथा

दुसऱ्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा घाटलोडिया, भाजप नेते हार्दिक पटेल यांचा विरमगाम तसेच गांधीनगर दक्षिणचा समावेश असून जिथून भाजपचे अल्पेश ठाकोर निवडणूक लढवत आहेत. जिग्नेश मेवाणी हे बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि गुजरात विधानसभेतील (Gujrat Election) विरोधी पक्षनेते सुखराम राठवा हे छोटा उदयपूर जिल्ह्यातील जेतपूरमधून उमेदवार आहेत.

बटाट्याचे नाही तर हिवाळ्यात हेल्दी गाजर फ्रेंच फ्राईज नक्की करा टेस्ट

Latest Posts

Don't Miss