spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘काळे झेंडे दाखवण्याचा धंदा आमचा, ते आमच्याकडून शिका’ असे विधान करत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना खडेबोल सुनावले

अद्यापही तुमच्या बापजाद्यांना ही कल्पना आली नाही की गरीब जनतेसाठी सरकार आहे. कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवत आहेत. काळे झेंडे दाखविण्याचा धंदा आमचा आहे

आज जळगावमध्ये (Jalgaon) शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) सुद्धा हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामुळे गेल्या दोन महिन्यात राज्यातील लाखो लोकांना फायदा झाला आहे.परंतु विरोधक यावर टीका करत आहे. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील या कार्यक्रमात म्हणाले की, जळगाव जसा केळी, कापूस पिकासाठी प्रसिद्ध आहे. तसेच जळगाव हे बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhari) यांच्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे हे सरकार या सर्व महापुरुषांच्या विचारावर चालते आहे. हे सर्व नेते लोकांमध्ये जाऊन काम करत आहे. त्यामुळे शासन आपल्या घरून, आता आपल्या दारी आले आहे. कोणतेही शासकीय योजेनेतून होणारे कामकाज शासन आपल्या दारी उपक्रमातून होणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी मी काही मागणार आहे. काही दिवसांपूर्वी केळी महामंडळाची घोषणा झाली होती. त्यासाठी शंभर कोटी मिळावे, त्याचबरोबर जळगावला आयुक्त कार्यालय घोषित करावे, अशी मागणी करत आपल्या मागण्या मंजूर होतील यावर दोन्ही नेत्यांवर विश्वास असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

तसेच हा उपक्रम जनतेसाठी असून कार्यक्रमाला स्वतःहून लोक येत आहेत. कुणावरही सक्ती केलेली नाही. यावरून लक्षात येतंय की, अद्यापही तुमच्या बापजाद्यांना ही कल्पना आली नाही की गरीब जनतेसाठी सरकार आहे. कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवत आहेत. काळे झेंडे दाखविण्याचा धंदा आमचा आहे. झेंडे कसे दाखवायचे ते आमच्याकडून शिका, असा टोला लगावत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : 

बनवाबनवी चित्रपटाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का ? | Do you know these things?

Most Expensive Watermelon – लाखोंच्या किमतीला विकले जात आहे हे कलिंगड कसे ते जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss