आम्ही शिवसेना सोडली नाही; गुलाबराव पाटील

शिंदे - भाजप सरकारने १६४ मतांचा आकडा गाठत महाराष्ट्रातील नव्या सत्ता स्थापनेवर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधक असे चित्र पहायला मिळणार आहे.

आम्ही शिवसेना सोडली नाही; गुलाबराव पाटील
आज विधिमंडळात शिंदे सरकार ची बहुमत चाचणी संपन्न झाली. शिंदे – भाजप सरकारने १६४ मतांचा आकडा गाठत महाराष्ट्रातील नव्या सत्ता स्थापनेवर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधक असे चित्र पहायला मिळणार आहे. शिंदे गट बहुमत सिद्ध करु शकत नाही असा दावा महाविकास आघाडीकडून या आधी करण्यात आला होता. परंतू शिंदे- भाजप सरकार ने महाविकास आघाडीचा दावा खोडून काढला आहे. दरम्यान सभागृहात अनेक नेत्यांनी भाषण केले.
या भाषणात गुलाबराव पाटील यांनी, शिवसेनेत आम्ही बंड नाही तर उठाव केला असे म्हटले आहे.
अनेकांनी आम्हाला विचारलं तुम्ही बंड का केलं ? आम्ही बंड केलेलं नाही, आम्ही उठाव केला आहे. हिंदुत्वाचा विचार बाजूला राहू नये म्हणूनच आम्ही हे पाऊल उचलले. ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. आज माझ्यासारख्या टपरी वाल्यावर टीका केली गेली. मला टपरीवर पुन्हा पाठवण्याची भाषा केली जाते. आम्ही सगळे शिवसैनिक या पदावर पोहोचण्या आधी ही सगळी कामे करूनच इथपर्यंत आलो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुध्दा आधी रिक्षा चालवायचे. टपरी वाला, रिक्षा चालवणारा, फुटाणे विकणारा झाला काही काम नव्हतं अशा नेतृत्वाना शिवसेनेनं पुढे आणलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळे आमच्यासारखे आज आमदार झाले हे आम्ही कधी विसरणार नाही. त्यामुळे आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
आज उद्धव ठाकरे सेना भवन येथे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांची बैठक घेणार आहेत. शिवसेनेची पुढची रणनीती आणि बांधणी यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.
Exit mobile version