spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवरायांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही, गुलाबराव पाटील संतापले

महाराष्ट्राचे राज्यपाल असुदे किंवा भाजपाचे नेते एका मागे एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यावर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यावरुनच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोखठोक विधान केलं आहे. माझे मंत्रिपद गेले तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीदेखील याचा जोरदार शब्दात समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही असे मंत्री गुलाबराव पाटील म्हटले. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाही, मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही असा आक्रमक इशाराही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

चार महिने झाले विरोधकांकडून सतत टीका सुरू असल्याचे पाटील यांनी म्हटले. आमच्या विकास कामांची जी गती आहे ती जनतेला आवडत आहे. आता मुख्यमंत्र्यांवर जे पैशांच्या उलाढालीचे गंभीर आरोप केले जात आहेत त्याने जनतेचे पोट भरत नाही. मागच्या दरवाजांनी निवडून आलेल्या संजय राऊत यांना पुढच्या दरवाजाने कसे निवडून यायचं हे माहीत नसल्याने ते अशा पद्धतीने गंभीर आरोप करत असल्याचा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.

हे ही वाचा : 

यवतमाळमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

वादग्रस्त वक्त्यवानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी

रिफायनरीबाबत राज ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss