गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

सध्या महाराष्ट्राचं राजकारण खुप तापल्याच दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठा बंद झाला आणि शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. तर आज शिवसेनेतून बंड करून शिंदे गट सामील झालेले आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री गुलराव पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे. मात्र त्यांच्यामुळे आमच्यात कोणताही फरक पडणार नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुका (Loksabha Election) आम्ही बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीत लढणार आहोत, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

सध्या भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीच्या प्रशवभूमीवर तयारीला लागली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या गटातले आमदार आणि राज्याचे मंत्री यांनी गुलाब पाटलांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, युतीमधल्या आमच्या नेत्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहिल, मग तो निर्णय शून्य जागा लढविण्यासाठीचा असला तरी तो आपल्याला मान्य असेल, मात्र ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितले पाहिजे, यावेळी त्यांनी विरोधी पक्षला टोला लगावला.

काही दिवसांपासून शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसून येत आहे. त्यावर त्यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, सरकारमध्ये ही धुसपूस होती आणि ती राहणारच आहे, धुसपूस झाल्यानेच तर आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, असा खोचक टोला ही त्यांनी यावेळी लगावला आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांच्यावर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांचं संदर्भातील हे प्रकरण विधान सभेत मांडले गेले होते. त्या ठिकाणी चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे विधान सभेत दिलेले आश्वासन हे सर्वोच्च असल्याने त्यावर लवकर कारवाई होणे अपेक्षित असल्याचं ही गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे.

हे ही वाचा : 

Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती घ्या जाणून

नवीन वर्षाची पहिली लढत होणार आज, भारत श्रीलंकेमध्ये पहिली T-20

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version