spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gulabrao Patil यांची जळगावात तुफान फटकेबाजी, एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अश्यातच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ऍक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अश्यातच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ऍक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. अश्यातच आता गुलाबराव पाटील यांनी जळगावात मात्र तुफान फटकेबाजी केली आहे. जळगावच्या (Jalgaon News) धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तब्बल १ हजार ३५० मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.

आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महिला मुलींसाठी खूप काही केला आहे. हे सरकार सुद्धा मुली आणि महिलांच्या पाठीशी उभं आहे. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana), महिलांना एसटी भाड्यात ५० टक्के सवलत दिली. मोठ्या आनंदात महिला भगिनी आता बसने प्रवास करतात. हे एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलं, ते बी दाढीवाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) बी दाढीवाले आणि गुलाबराव बी दाढीवाले. लाईन लगी है सब… देशातले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की, ज्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय एकनाथ शिंदे दाढीवाल्याने घेतला आहे. अशी तुफान फटकेबाजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulbarao Patil) यांनी केली आहे.

बरेच राजकारणी लोक माझ्यावर टीका करतात आणि मी सायकल देतो तुम्ही टायर तर देऊन बघा. तुम्हाला करता आलं नाही. तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनच कमिशन घेता येतं. बाकी दुसरं काही करता येत नाही. कमिशनमधून थोडं वाट ना बाबा. दोन हजारांची पावती फाडतो आणि चार वेळेस मोबाईल आणि व्हाट्सअपवर टाकतो. या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे राजकीय विरोधक गुलाबराव देवकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Latest Posts

Don't Miss