राजस्थानमधील सत्तासंघर्षावर गुलाम नबी आझादांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच आझाद यांनी पक्षाची सर्व सल्लागार यंत्रणा उद्ध्वस्त केल्यावरून

राजस्थानमधील सत्तासंघर्षावर गुलाम नबी आझादांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राजस्थानमधील सत्तासंघर्षामुळे तिथलं राजकीय वातावरण चांगलच तापलय काँग्रेसमधील अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष निर्माण झाल्यामुळे राजस्थानमधील राज्य सरकार पुन्हा एकदा संकटात सापडलं आहे. अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होण्याच्या तयारीत असताना, त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळे आता सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. पण अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांचा सचिन पायलट यांच्या नावाला विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर ८२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करत नवी खळबळ माजवली आहे.

अलीकडेच २६ ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलेल्या काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना राजस्थानातील राजकीय संकटाबाबत विचारलं असता त्यांनी “जे गाव सोडलंय, त्याचं नाव घेऊ इच्छित नाही” अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच आझाद यांनी पक्षाची सर्व सल्लागार यंत्रणा उद्ध्वस्त केल्यावरून राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली होती.

राजस्थानातील सत्तासंघर्ष नेमका काय आहे?

राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे विधिमंडळ गटाचा नवा नेता निवडण्यासाठी त्यांनी रविवारी रात्री आमदारांची बैठक बोलावली होती. पक्षाचे प्रभारी अजय माकन आणि पक्षनिरीक्षक म्हणून मल्लिकार्जुन खरगेही बैठकीला उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही या बैठकीला हजर झाले होते. या बैठकीमध्ये केवळ नेतानिवडीचे सर्वाधिकार केंद्रीय नेतृत्वाला देण्याची औपचारिकता पार पाडली जाणार असल्याचे गेहलोत यांनी स्वत: जाहीर केले होते. मात्र, बैठकीपूर्वी गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनामास्त्र उगारले आहे.

हे ही वाचा:

२०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन, पटियाला हाऊस कोर्टाने दिला दिलासा

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव तापाने फणफणला होता, व्हिडीओ झाला व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version