गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांना अटक करण्याची केली मागणी

गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांना अटक करण्याची केली मागणी

काही दिवसांपासून अनेक नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा निषेद म्हणून आज अनेक शिवप्रेमींकडून पुणे बंदची (Pune closed) हाक देण्यात आली आहे. डेक्कन ते लालमहाल असा मोर्चाही काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. यात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसलेदेखील (Chhatrapati Udayanraje Bhonsle) सहभागी झाले आहेत. पण हा बंद बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायलयाने अनेकदा सांगितलं आहे की बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आलाय. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी, असं सदावर्ते म्हणालेत.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Babasaheb Ambedkar Marathwada University) पदवीदान समारंभात नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली तेव्हा बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट शिवरायांशी केली होती. तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

हे ही वाचा : 

Zika virus झिका व्हायरसने कर्नाटकाचे दार ठोठवले, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा विषाणू

भारत चीन मुद्यावर राजनाथ सिंह यांचे संसदेत उत्तर

संजय राऊतांचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर हल्लाबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version