spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंनी तह केला असता तर शिवसेना फुटली नसती, गुलाबराव पाटीलांचा टोला

युद्धाच्यावेळी शिवाजी महाराज तह करायचे तसाच तह जर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला तर आज शिवसेनेवर हि वेळ आली नसती

युद्धाच्यावेळी शिवाजी महाराज तह करायचे तसाच तह जर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला तर आज शिवसेनेवर हि वेळ आली नसती, शिवसेना फुटली नसती, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. शिवसेना सोडून शिंदे गटात जाणार मी काही पहिला आमदार नव्हतो. माझ्याआधी ३२ आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील झाले आणि मी ३३ वा आमदार होतो. गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो. त्यांना काय चाललंय, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी त्यावेळी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळीच दुरुस्ती केली असती, तह केला असता तर ही वेळ आली नसती, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

शिंदे गट तयार झाल्यापासून आणि शिंदे गटात अनेक आमदार सामील झाल्यापासून शिवसेनेकडून शिंदे गटावर मोठ्या प्रमाणावर टीका केल्या जात आहेत. पण या टीकांना शिंदे गटाकडून देखील सडेतोड उत्तर दिली जात आहेत. ३२ आमदार फुटल्यानंतर आधी मी उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यांच्यासमोर आमदारांचं म्हणणं मांडलं. काही तरी निर्णय घेतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे मला इतर आमदारांसोबत जावं लागलं. आदित्य ठाकरे आता राज्यभरात फिरत आहेत. ते ३२ वर्षांचे तरुण आहेत. मंत्री असताना त्यांनी राज्यात फिरावे, हेच आम्ही सांगत होतो. पण आदित्य ठाकरे आताही राज्यभरात फिरत असतील, तर परमेश्वर त्यांचं भलं करो, असा टोलादेखील गुलाबराव पाटीलांनी लगावला.

शिवसेनेकडून शिंदे गटातील आमदारांचा वारंवार ‘गद्दार’ असा उल्लेख केला जात आहे. तर शिवसेनेच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी भाजपाशी युती केली मग आम्ही गद्दार कसे? आम्ही जो प्रयत्न केला तो शिवसेना वाचवण्यासाठीच केला. मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत”.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात आम्ही नुकतीच ५० थरांची दहीहंडी फोडल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरही प्रतिक्रिया व्यक्त करताना गुलाबराव पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी बरोबर वक्तव्य केलं आहे. त्यांनी जर ५० थरांची दहीहंडी फोडली नसती तर राज्यात सत्तांतरण झाले नसते.

हे ही वाचा:

सिसोदिया यांच्या अडचणी वाढ; सीबीआयने केली लुकआउट नोटीस जारी

Latest Posts

Don't Miss