Har Har Mahadev चे शो बंद पाडल्यास खळ्ळखट्याकचा इशारा; मनसे आक्रमक

हर हर महादेव (Har Har Mahadev) या सिनेमाचा वाद अजूनही सुरूच आहे. हा वाद काही थांबताना दिसत नाही. अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले आहेत. स्वत: राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी या सिनेमाला विरोध करत सिनेमाचे शो बंद पाडले.

Har Har Mahadev चे शो बंद पाडल्यास खळ्ळखट्याकचा इशारा; मनसे आक्रमक

हर हर महादेव (Har Har Mahadev) या सिनेमाचा वाद अजूनही सुरूच आहे. हा वाद काही थांबताना दिसत नाही. अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले आहेत. स्वत: राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी या सिनेमाला विरोध करत सिनेमाचे शो बंद पाडले. इतकेच नव्हे तर या सिनेमातील तथ्यांवर आक्षेप घेत ब्राह्मण महासंघानेही या सिनेमाला विरोध दर्शविला आहे. हा विरोध सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) मात्र या सिनेमाची बाजू घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या सिनेमाचे शो रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास खळ्ळखट्याक होईल, असा इशाराच मनसेने दिला आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची मान्यता आहे तर शो रद्द करण्याचे कारण काय आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उपस्थित केला आहे. पुण्यात बंद केलेले हर हर महादेव चित्रपटाचे शो आज दुपारपासून पुन्हा सुरु केले जाणार आहेत. हिंदू जननायक राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी जर कोणी चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न करणार असेल तर खळ्ळखट्याक होणार, अशी प्रतिक्रिया मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे (MNS state general secretary Ajay Shinde) यांनी दिली आहे.

हर हर महादेव चित्रपटाला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यातील थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो दाखवले गेले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. कोणाच्याही दबावाखाली येत चित्रपटाचे शो बंद करु नका, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित हर हर महादेव हा चित्रपट प्रसारित करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आमनेसामने आले आहेत. याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. पुण्यात आज दुपारपासून हर हर महादेव या चित्रपटाचे शो सुरु करण्यात येणार आहे. त्यावेळी अनेक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि मनसे पुन्हा आमनेसामने येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे मनसेचे नेते आणि कार्यकर्ते दुपारनंतर पुण्यातील विविध चित्रपटगृहांचा आढावा घेणार आहे.

राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी चित्रपटाला विरोध करू नका, असं सांगतानाच मनसे पदाधिकारी आज पुन्हा शोज सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, काल मुंबईतील मनसे नेत्यांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावर असलेल्या आयनॉक्स सिनेमा व्यवस्थापकांना हर हर महादेव सिनेमा तात्काळ सुरू करावा यासाठी पत्र दिले. मनसे कामगार नेते, विधानसभा अध्यक्ष व नाविक सेना सरचिटणीस संदीप राणे यांच्या नेतत्वाखालील हे पत्र देण्यात आले. हा सिनेमा तात्काळ सुरू करण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

छत्रपती संभाजीराजेंच्या आक्षेपानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली होती. पुण्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपट बंद पाडला होता. विशाल टॉकीजमध्ये हा शो सुरु होता, तेव्हाच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थिएटरमध्ये घुसले. थिएटरमध्ये असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना बाहेर काढून त्यांनी हा शो थांबवला होता. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरणात निर्माण झाले होते.

हे ही वाचा :

IND vs ENG Semi Final : रोहित शर्मा उपांत्य फेरीत खेळणार नाही? कालच्या दुखापतीवर महत्वाचे अपडेट्स आले समोर

Earthquake : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यं भूकंपाने हादरली, नेपाळमध्ये मृत्यू

Justice DY Chandrachud : न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश, ४४ वर्षानंतर वडिलांची जबाबदारी पुत्रावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version