spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कायद्याशी खेळण्याचं ओपन लायसन्स गृहमंत्र्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिलंय का? – Supriya Sule

भरीत भर म्हणजे गोळीबार करणारे भाजपा आमदार 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यावर राज्यात गुंडगिरीचं वाढणार' असा थेट आरोप करतात.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर उल्हासनगर येथे गोळीबार केला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रकरणात भाजप आमदारा गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. याच प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राबाबत चिंता व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात भाजपाचे खुले ‘गुंडाराज’ सुरु

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेशी खेळ करण्याचं ओपन लायसन्स गृहमंत्री महोदयांनी भाजपाच्या नेत्यांना दिलंय का? पुण्यात भाजपाचे आमदार पोलिसांच्या श्रीमुखात भडकावितात आणि उल्हासनगरमध्ये माजी नगरसेवकांवर गोळीबार करतात. ही या खोके सरकारची सत्ता आणि पैशांची मस्ती आहे. यांचा खेळ होतो पण सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे मात्र हाल होतात. भरीत भर म्हणजे गोळीबार करणारे भाजपा आमदार ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यावर राज्यात गुंडगिरीचं वाढणार’ असा थेट आरोप करतात. हा आरोप अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात भाजपाचे खुले ‘गुंडाराज’ सुरु आहे आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांतपणे हे सगळं पाहत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेची गांभिर्याने दखल घेऊन महाराष्ट्र सरकार तातडीने बरखास्त करायला हवे. शांतताप्रिय सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी गुंडगिरी खपवून घेता कामा नये. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही

सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिंदे गटातील (SHINDE GROUP) आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपवाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता! असे विजय वडेट्टीवार ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

Latest Posts

Don't Miss