Sharad Pawar माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेत?: Hasan Mushrif

Sharad Pawar माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेत?: Hasan Mushrif

भाजप नेते समरजित सिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी काल (मंगळवार, ३ सप्टेंबर) ऐतिहासिक गैबी चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात (NCP Sharad Pawar) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी नाव न घेता हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर टीका करत लाचार म्हणून उल्लेख केला. तसेच, ” संकटाच्या काळात बरोबर राहण्याऐवजी जे पळून गेले. त्यांचा आता हिशोब करायचा आहे,” असे वक्तव्य करत हसन मुश्रिफांवर निशाणा साधला. या वक्त्यव्यामुळे राजकीय वातावरणात चर्चाना उधाण आले असतानाच आता हसन मुश्रीफ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या का मागे लागलेत माहीत नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी, “पवारसाहब से वैर नही, समरजीत तुम्हारी खैर नही,” असे म्हणत समरजित घाटगे यांना टोला मारला आहे.

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रितिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले, “शरद पवार माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या का मागे लागलेत माहीत नाही. शरद पवार यांनी नेहमीच जनतेचा विचार केलेला आहे. निवडणूकीचा निकाल ठरवेल. निवडणूकीच्या आधी काही बोलणं योग्य नाही. कोणत्या ही माणसाला आम्ही कमी लेखत नाही. माझ्या सहा निवडणुकांमध्ये आले तेव्हा नेहमी म्हणायचे कि, राजाविरोधात प्रजा जिंकली पाहिजे. तेच मी पुन्हा म्हणत आहे कि, पवारसाहब से वैर नही, समरजीत तुम्हारी खैर नही.”

ते पुढे म्हणाले, “पवार साहेब माझे दैवत आहेत. आमचे पंन्नास आमदार गेले आहे पण शरद पवार माझ्या मागे का लागलेत ते मला समजलेलं नाही. शरद पवार माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या का मागे लागलेत माहीत नाही. ही निवडणूक नायक विरुध्द खलनायक आहे. किती बदल होईल ते निवडणूक ठरवेल,” असे ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी काल गैबी चौकातून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता टीका कारली आणि त्यांचा उल्लेख लाचार असा केला होता. त्याचवेळी ते म्हणाले, “आम्ही कागल तालुक्यातील काही लोकांना साथ दिली, त्यांना मोठं केलं, आमदार म्हणून निवडून आणालं. त्यांना मंत्रीपद दिलं. मात्र, संकटाच्या काळात बरोबर राहण्याऐवजी ते पळून गेले. त्यांचा आता हिशोब करायचा आहे,” असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

Minority Community Foreign Scholarship Application: अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या Scholarship Form ची मुदत वाढली, ‘या’ आहेत अटी

Mukhyamantri Majhi Ladki Bahin सन्मान यात्रेला उदंड प्रतिसाद, Worli विधानसभेतून भरले ‘इतके’ अर्ज

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version