Saturday, July 6, 2024

Latest Posts

Chhagan Bhujbal ओबीसींचा चेहरा, राज्याला त्यांची गरज, नाराजीनाट्यावर Hasan Mushrif यांचे सूचक विधान

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मोठे वक्तव्य करत, "छगन भुजबळ पक्षात नाराज नसून त्यांची राज्यात गरज आहे," असे म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) काल (गुरूवर, १३ जून) राज्यसभा खासदार म्हणून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नाराजीनाट्य सुरु झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राज्यसभा खासदारकीची इच्छूक होते पण त्यांना डावलून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मोठे वक्तव्य करत, “छगन भुजबळ पक्षात नाराज नसून त्यांची राज्यात गरज आहे,” असे म्हंटले आहे.

हसन मुश्रिफ यांनी आज (शुक्रवार, १४ जून) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “छगन भुजबळ पक्षात नाराज नाहीत. छगन भुजबळ ओबीसीचा चेहरा म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत. त्यांचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत होणार आहे. भुजबळ यांची राज्यात गरज आहे असे आम्ही त्यांना विनंती केली.”

आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) महायुतीमधे (Mahayuti) आता जागावाटपावरून चर्चा होणार आहेत. यावर भाष्य करत हसन मुश्रीफ म्हणाले, “भारतीय जनता पक्ष (BJP) हा मोठा पक्ष असल्याने त्यांना जास्त जागा मिळणार आहेत. परंतु राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला (Shivsena) स्वतःच्या जागा मिळणारच आहेत. जागा वाटपावरून महायुतीत कोणताही विसंवाद नाही.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवार, १२ जुलै रोजी रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी, सुनेत्रा पवार यांच्या नावाची बिनविरोध निवड करण्यात आली. यानुसार, सुनेत्रा पवार यांनी सकाळी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला. त्यांच्याव्यतिरिक्त कोणाचाही अर्ज आलेला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सुनेत्रा पवार यांना दिलेल्या राज्यसभा खासदारकीवरून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी त्या म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीबाबत कोणतीही नाराजी दिसलेली नाही. फॉर्म भरतेवेळी भुजबळ देखील पक्षातर्फे उपस्थित होते. त्यांनी देखील मलाया शुभेछया दिल्या.”

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss