हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटक पूर्व जामिनाला ईडी चा कडाडून विरोध

सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडी कडून हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांना नोटीस देण्यात आली आहे . त्या संदर्भात हसन मुश्रीफ ह्यांनी मुलांच्या अटक पूर्व जमिनीची मागणी केली आहे .

हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटक पूर्व जामिनाला ईडी चा कडाडून विरोध

सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडी कडून हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांना नोटीस देण्यात आली आहे . त्या संदर्भात हसन मुश्रीफ ह्यांनी मुलांच्या अटक पूर्व जमिनीची मागणी केली आहे . त्याबद्दल ची सुनावणी ६ मार्च रोजी सत्र न्यालयामध्ये होणार आहे. हसन मुश्रीफ वांच्यावर ३५ कोटी च्या मनी लॉण्डरिंग चा गुन्हा दाखल केला आहे. नाविद, आबिद, साजिद अशी हसन मुश्रीफ यांच्या मुलांची नाव आहे. त्या तिघांच्या अटक पूर्व जामिनाला ईडी चा सक्त विरोध आहे. ईडी च्या मते त्या तिघांनीही चौकशी दरम्यान कोणत्याही प्रकारच सहाय्य केल नाही. त्यांना मनी लॉण्डरिंगच्या संदर्भात समन्स पाठवला होता तरीही ते चौकशीला उपस्थित राहिले नाही. त्यामुळेईडी ची मागणी आहे कि त्यांना अटक पूर्व जमीन मिळू नये. दरम्यान , सुनावणी चालू असे पर्यंत कोणत्याही प्रकारची सक्त कारवाई करण्यात येणार नाही अस आश्वासन दिखील ईडी ने दिल आहे.हसन मुश्रीफ ह्याच्या मुलांकडून हि केस जेष्ठ वकील आबाद पौंड अमित देसाई, प्रशांत पाटील लढत आहे ,तरीही ईडी या विषयावर आपला विरोध कायम ठेऊन आहेत.

हसन मुश्रीफ ह्यांच्यावर ४० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल –
हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यात विनायक कुलकर्णी यांच्या सह अनेक लोकांना भागभांडवल देतो सांगून फसवले आहे असा गुन्हा दाखल आहे. ज्यात त्यांनी लोकांना जवळपास ४० कोटींना फसवल्याचा उल्लेख आहे. हसन मुश्रीफ ह्यांच्या मुलांनी सांगितलं आहे कि ह्या अटकेच्या धमक्या राजकीय हेतूने देण्यात येत आहे. ह्या आधी जेव्हा हसन मुश्रीफ ह्यांना अटक करण्यात आली होती तेव्हा हसन मुश्रीफ ह्याच्या कार्यकर्त्यांनी जेल बाहेर ठिय्या आदिलन केले होते, त्यानंतर हि फिरियाद दाखल करणारे विनायक कुलकर्णी सह १६ जणांवर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. २०१२ मध्ये हसन मुश्रीफ यांनी कारखान्याच्या उभारणी साठी १० हजार रुपय शेअर घेतले आणि त्यातच लेणी लोकांचे ४०कोटींचं घोटाळा केल्याचा संशय ईडीला आहे

हे ही वाचा :

Exclusive, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या खळबळजनक निकालावर, जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि अभिजित ब्रम्हनातकर म्हणाले…

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच महागाईचा तडाखा!, LPG सिलेंडर मध्ये ५० रुपयांची वाढ

पहाटेच्या शपथ विधीचं रहस्य अखेर अजित पवारांकडून उलगडणार, आत्मचरित्र लिहिन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version