सरकारकडून देशात द्वेष पसरवला जात; निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडली- मल्लिकार्जुन खरगे

सरकारकडून देशात द्वेष पसरवला जात; निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडली- मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिकल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, ”काँग्रेस अध्यपदाच्या निवडणुकीचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी पक्षाचे प्रतिनिधी, नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी या लोकशाही प्रक्रियेत भाग घेऊन काँग्रेसला बळकट केलं आहे.” यावेळी बोलताना ते खासदार शशी थरूर यांच्याबद्दल म्हणाले आहेत की, माझे साथी शशी थरूर यांना मी शुभेच्छा देतो. कारण निवडणुकीत आम्ही दोघे प्रतिनिधी म्हणून उभे होतो. मात्र निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडली, असं ते म्हणाले आहेत.

सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावतीनं सोनिया गांधी यांचे आभार मानतो. त्यांनी वैयक्तिक त्याग करुन २३ वर्ष काँग्रेससाठी दिली. सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात दोन वेळा केंद्रात सरकार स्थापन केलं. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला उभारी दिली. सोनिया गांधी यांचा कार्यकाळ इतिहासात लक्षात ठेवला जाईल. आज देशात सर्वात मोठी समस्या महागाई, बेरोजगारी आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढती दरी कमी करणं, देशात वाढवली जाणारी द्वेष भावना कमी करणं या प्रश्नांवर देशवासियांना एकत्रित आणण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा करत आहेत.

संपूर्ण देशातील लोक या यात्रेशी जोडले जात आहेत. देशातील काँग्रेस कार्यकर्ते आणि जनतेनं भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावं, असं आवाहन खर्गे यांनी केलं. राहुल गांधी यांनी फोनवरुन चर्चा केली. त्यांनी माझं अभिनंदन केलं. मी काँग्रेसच्या सैनिकासारखं काम करत राहीन,असं राहुल गांधी म्हणाल्याची माहिती मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. भारत जोडो यात्रेत असूनही त्यांनी वेळ काढून फोन केला याचा आनंद आहे. काँग्रेसमध्ये कोणी मोठा नाही छोटा नाही, आपल्याला काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. देशाच्या संविधानावर होणारे हल्ले आणि लोकशाही संपवण्याच्या प्रयत्नांविरोधात लढायचं आहे. फॅसिझम आणि सांप्रदायिकतेविरुद्ध लढायचं आहे, असं मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.

हे ही वाचा :

लातूरमधील १६ उद्योजकांना डावलून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर; भाजपाचा आरोप

पाठीच्या दुखापतीमुळे हरमनप्रीत कौरनची महिलांच्या बिग बॅश संघातून माघार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version