spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाण्यात सभा लावा, मी आलोच…  उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला होता त्यानंतर दोन्ही गटामध्ये खरी शिवसेना कोणती यावरून वाद सुरु आहे.  आणि  ज्या-ज्या वेळी शिवसेनेवर आघात झाले, तेव्हा शिवसेना दसपट मोठी होते. ठाण्यात चिडीचूप होईन, असे दाखवले गेले. पण तिथे चिडून उठले आहेत. ठाण्यात सभा लावा, मी आलोच म्हणून समजा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केल्या.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात (Thane) सभा घेणार आहेत. ठाण्यातील माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर (Sanjay Ghadigaonkar) आणि यवतमाळचे माजी आमदार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी लवकरच ठाण्यात सभा घेण्याची सूचना त्यांनी केली. तसंच पोहरादेवीचा (Poharadevi) दौरा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं.
आता ठाणे म्हणजे चिडीचूप असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. चिडीचूप झाले नाही पण ते चिडीने पेटून उठले आहेत. पोहरादेवीला मेळावा घ्यायचे जाहीर केले आहे. आता मी ठाण्यात पण सभा घेईन. तुम्ही ठाण्यात सभा लावा मी आलोच असे समजा, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सध्या माझी भूमिका ही एखाद्या शिक्षकासारखी झाली आहे. कारण विद्यार्थी बदलतात पण शिक्षक एकच आहे आणि बोलायचं तेच असतं. आताही तुम्ही येता पाहिलं असेल की गर्दी होती. मी प्रयत्न करत होतो दोन वर्ग एकत्र घ्यायचा पण ते मावणार नाही. हेच आपलं वैभव आहे.”

Latest Posts

Don't Miss