राजकारण करण्यासाठी आले आहात की राज्याच्या विकासासाठी? योगी आदित्यनाथ यांच्या रोड शो वर राऊतांच्या सवाल

गुंतवणुकीसाठी रोड शो कशासाठी ? राजकारण करण्यासाठी आले आहात की राज्याच्या विकासासाठी आले आहात?, असे सवाल करत हे 'राजकीय उद्योग इथे नका करू.राजकारणाचे धंदे बंद करा," असं संजय राऊत म्हणाले.

राजकारण करण्यासाठी आले आहात की राज्याच्या विकासासाठी? योगी आदित्यनाथ यांच्या रोड शो वर राऊतांच्या सवाल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. उत्तरप्रदेशमधील गुंतवणूक वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या राज्याच्या विकासाठी ते मुंबईतील उद्योगपती, सिनेदिग्दर्शक, निर्माते तसेच बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक कारण्यासंबंधी आव्हान करणार आहेत. त्याचबरोबर ते मुंबईतील ताज हॉटेलच्या बाहेर रोड शो देखील करणार आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना फाटकारले आहे.

संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ ताज हॉटेल बाहेर रोड शो करणार आहेत, यावर,”योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये रोड शो कशासाठी करणार आहेत?, असा सवाल केला आहे. त्याच पुढे बोलताना ते म्हणाले,”आमच्याकडचे उद्योग ओरबडून नेणार असेल तर यावर आमचा आक्षेप आहे. मुंबईत गुंतवणुकीसाठी रोड शो करत असतील तर आश्चर्यकारक आहे. गुंतवणुकीसाठी रोड शो कशासाठी ? राजकारण करण्यासाठी आले आहात की राज्याच्या विकासासाठी आले आहात?, असे सवाल करत हे ‘राजकीय उद्योग इथे नका करू.राजकारणाचे धंदे बंद करा,” असं संजय राऊत म्हणाले.

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाओस दौऱ्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दाओसला जाणार आहेत. दाओसमध्ये गुंतवणूकदारांची परिषद असते. दाओसमध्ये जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिकडे रोड शो करणार आहात का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

त्याचबरोबर नोइडामध्ये उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटीबद्दल पण त्यांनाही भाष्य केलं. मुंबईतून फिल्मसिटी घेऊन जाणार आहात का? पण लोक तर इथे काम करतात. फिल्म इंडस्ट्री ही संपूर्ण देशाची आहे. दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात फिल्म इंडस्ट्रीची मुहूर्तमेढ रोवली. देशातील सर्व राज्यांमध्ये फिल्मसिटी झाली पाहिजे. दक्षिणेतही आहे. योगींनीही करावी. योगींना फिल्म सिटी बनवायची असेल तर स्वागत आहे. योगी मुंबईत आलेत. त्यांना कुणालाही भेटू द्या. पण मुंबईतील फिल्म इंडस्ट्री अशी कोणी खेचून नेऊ शकते का? अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित हे काय गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा, कानपूर, लखनऊला उडत जाऊन राहणार आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

यापुढे संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबचा ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केलेला व्हिडिओ अमोल मिटकरी यांनी पोस्ट केला होता, त्यावरही भाष्य केलं.यावेळी बोलताना संजय राऊत यांनी बावनकुळेंसोबतच भाजपला देखील टोला लगावला आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले,”त्यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं, म्हणूनच त्यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केला. उद्या कसाबजी म्हणतील. मग अफजल गुरुजी म्हणतील, अफजल खानजी म्हणतील. मग शाहिस्ते खानजी म्हणतील. यावरच त्या पक्षाची रोजीरोटी सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुंबई मगनगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाने जोरदार तयारी सुरु केली असून शिंदे गटाच्या १२ नेत्यांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे, असं सांगितलं जात आहे. यावरून देखील संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल कला आहे.यावेळी संजय राऊत म्हणाले,”रणनीती म्हणजे नेमकं काय करतायत? हे तुम्हाला माहिती आहे का? खोके, पेट्या, पाकिटे कशी आणि कुठे वाटायची आणि कुणाला कसे विकत घ्यायचे, हीच त्यांची रणनीति असते. रणनीति आता मतदार ठरवतील. या लोकांचे काय करायचे हे मतदार ठरवतील. खोकेवाले कधी येतायत, याची आता मतदार वाट पाहत आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

हे ही वाचा:

Yogi Adityanath यांचं उत्तर प्रदेश विकासावर भाष्य, उत्तर प्रदेशचे आहोत हे सांगायला संकोच व्हायचा…

Amazon मध्ये काम करणाऱ्या १८,००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा!

पक्ष बळकटीसाठी उद्धव ठाकरे स्वतः राहणार नाशिकमध्ये उपस्थित, जानेवारीअखेरीस होणार जाहीर सभा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version