spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

AKSHAY-AJAY-SHAHRUKH ला हायकोर्टाची नोटीस, काय आहे कारण?

बॉलिवूडचे स्टार्स त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्याशिवाय वेग-वेगळे अभिनेते अनेक वेग-वेगळ्या वस्तूंच्या जाहिराती करून प्रेक्षकांच्या मनात घर करत असतात. अमुक एक अभिनेत्याने किंवा तमुक अभिनेत्रीने सांगितलं म्हणजे ही वस्तू चांगलीच असणार, असा विचार करून नागरिक त्या वस्तूकडे आकर्षित होतात, आणि ती वस्तू खरेदी करतात. अशाच जाहिराती करणारे ३ अभिनेते आता अडचणीत सापडले आहेत. शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण या अभिनेत्यांना हायकोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

शाहरुख खान (SHAHRUKH KHAN), अक्षय कुमार (AKSHAY KUMAR) आणि अजय देवगण (AJAY DEVGAN) यांना अलाहाबाद हायकोर्टाच्या (ALLAHABAD HIGH COURT) लखनऊ खंडपीठाने नोटीस पाठवली  आहे. ही नोटीस पान मसाला कंपन्यांच्या (Paan Masala Company) जाहिराती प्रकरणी बजावण्यात आली आहे. यामुळे नेहमीच चर्चेत असणारे हे अभिनेते आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. अवमान याचिकेला उत्तर देताना, केंद्र सरकारने अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाला कळवले की त्यांनी अभिनेते अक्षय कुमार (AKSHAY KUMAR), शाहरुख खान (SHAHRUKH KHAN) आणि अजय देवगण (AJAY DEVGAN) यांच्यावर गुटखा कंपन्यांच्या सहभागाबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही अभिनेत्यांना त्यांनी केलेल्या जाहिरातीच्या प्रकरणाबाबत  नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.

याचिकाकर्त्याने सुनावणीदरम्यान सांगितले की, २२ ऑक्टोबर रोजी काही व्यक्तींनी या अभिनेत्यांच्या वतीने सरकारसमोर आपले म्हणणे मांडले. परंतु या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर अवमान याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली होती. डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी हायकोर्टात सांगितले की, केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सध्या सुप्रीम कोर्टात देखील याच मुद्द्यावर सुनावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत याचिका तातडीने फेटाळण्यात यावी, अशी माहिती केंद्राच्या वकिलांनी शुक्रवारी हायकोर्टाला दिली. युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने ९ मे २०२४ रोजी सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने यापूर्वी केंद्र सरकारला याचिकाकर्त्याच्या प्रतिनिधीत्वावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. ज्यांनी मुळात अभिनेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे असा युक्तिवाद केला होता. ज्यांना उच्च प्रोफाइल पुरस्कार देण्यात आले होते. परंतु, तेच गुटखा कंपन्यांसाठी जाहिरात करत होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss