spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण निशाणी गोठवण्याचं पाप यांनी केलं; भास्कर जाधव

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठी फूट पढली त्यानंतर खरी शिवसेना कोणती यासाठी दोन्ही गटांमध्ये वाद सुरु असल्याचा दिसून येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसेना दोन पावलं पुढे नेली, असं विधान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत कार्यकर्त्यांवरील पोलीस कारवाईविरोधात उद्धव ठाकरे गटानं निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी जाधव यांनी भाषण केलं यावेळी ते बोलत होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी खूप कल्पकतेनं, संयमीपणे आणि खूप नियोजन बद्धरित्या बाळासाहेबांपेक्षा शिवसेना दोन पावलं पुढं नेण्याचं काम केलं. पण सातत्यानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल समाजात शंका-कुशंका पद्धतशीरपणे निर्माण करणं त्यासाठी वेगवेगळ्या पतळीवर टीकाटिप्पणी करण्याचं काम सातत्यानं सुरु होतं. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव गोठवण्याचं काम झालं. असं भास्कर जाधव यांनी म्हटलं. पण आता मशाल चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण निशाणी हे याच्या नावानं मोठे झाले त्यांनी ते गोठवण्याचं पाप केलं. पण नियतीनं तुमच्यासाठी नवं दार उघडलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे नावानं जे काही शिवसेनेनं होईल ते उद्धव ठाकरेंचं असेल, अशा करता नवीन संधी तुम्हाला दिलेली आहे. नव्या शिवसेनेचा जन्म झालेला आहे.

तुमच्या नेतृत्वाखाली आता नवीन शिवसेना उभी करावी लागणार आहे. हे होत असताना कार्यकर्त्यांना तडीपारच्या नोटीसा दिल्या जात आहेत. कोणावर ईडीची, सीबीआयची कारवाई, तर कोणावर इन्कम टॅक्सची कारवाई केली जात आहे. संजय राऊतांचा काय दोष आहे? ५५ लाख रुपयांची रिटर्न एन्ट्री होती फक्त तुम्हीतर ५० कोटी एकेकाला दिलेत आणि ५५ लाखांसाठी तुम्ही त्यांना जेलमध्ये बसवलंय. का तर त्यांनी देखील शिवसेना सोडावी. नाहीतर मोठ्या त्रासाला सामोर जावं लागेल, असा इशारा त्यांना दिला. पण राऊतांनी मोडेल पण वाकणार नाही, हा पवित्रा घेतला. कुडाळमध्ये माझ्या घरावरही हल्ला झाला, त्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील घाबरता कामा नये, असं आवाहनही यावेळी भास्कर जाधव यांनी केलं.

हे ही वाचा :

Congress President Election : मोठी बातमी ! मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

पोलिसांची दिवाळी गोड करा; मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांचा उपमुख्यमंत्र्यांना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss