‘वर्षा’ सोडताना नवरीसारखं सोंग केलं; संदिपान भुमरेंची खोचक टीका

वर्षा बंगला सोडला तेव्हा एखादी नवरी कशी घर सोडते, तसे सोंग केले असल्याची बोचरी टीका भुमरे यांनी केली.

‘वर्षा’ सोडताना नवरीसारखं सोंग केलं; संदिपान भुमरेंची खोचक टीका

वर्षा बंगला सोडताना जेव्हा एखादी नवरी घर सोडते तसं यांनी सोंग केलं अशी टीका राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. शिंदे गटाच्या ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’ निमित्त अमरावतीत झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकरदेखील (Arjun Khotkar) उपस्थित होते.

शिंदे गटाच्या ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’ निमित्त अमरावती जिल्ह्यामध्ये संघटनात्मक मार्गदर्शन भुमरे आणि खोतकर यांनी केले. अमरावती शहरातील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराच्या हॉलमध्ये हा मेळावा पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिंदे गटातील शिवसेनेचे कार्यकर्ते हजर होते. यावेळी संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मातोश्रीवर गोचीड जमा झाले आहेत. कोणत्याच फाइलवर सही न करण्यास हे गोचीड सांगत होते. सही केली तर अडचणीत याल, असेही सांगत होते. त्यांच्यामुळे कोणाचेच काम झाले नाही असा गंभीर आरोपही भुमेर यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

शिंदेगटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत खूप मोठी फूट पडली त्यानंतर अनेक नेत्यांनी सुरतमध्ये आश्रय घेतला. शिंदेगटात आणि शिवसेनेत फूट पडत असताना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केले होते. आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडला. उद्धव यांनी वर्षा बंगला सोडण्याच्या निर्णयावरही भुमरे यांनी जोरदार टीका केली. वर्षा बंगला सोडला तेव्हा एखादी नवरी कशी घर सोडते, तसे सोंग केले असल्याची बोचरी टीका भुमरे यांनी केली.

संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोरोना काळातील मास्क वापराबाबतही टीका केली. आम्ही उद्धव यांना भेटण्यासाठी जायचो तेव्हा मास्क वापरायचे. आता, सरकार गेले तेव्हा मास्कही गेला, कोरोनाही गेा आणि कोरोनाही गेला असल्याची टीका भुमरे यांनी केली. वांद्रे-कुर्ला संकुलावर आपला दसरा मेळावा होणार असून कोणाचा मेळावा मोठा होतो ते आता पाहूनच घेऊ असे म्हणत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले.

हे ही वाचा:

‘केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात….’, निर्मला सितारमन यांचा सवाल

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केले कार्यकर्त्यांना आवाहन म्हणाले, कुणी एक मारली तर तुम्ही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version