Wednesday, September 25, 2024

Latest Posts

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची जीभ पुन्हा एकदा घसरली, विरोधकांवर खालच्या शब्दात टीका

नेहमी कुठल्या न कुठल्या वादात सापडणारे आणि वादग्रस्त टीका करणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा वादात सापडले आहे. बीड दौऱ्यावर आलेल्या तानाजी सावंत यांनी विरोधकांना इशारा देताना खालच्या पातळीवर टीका केली. शिवसेनेसोबत (Shivsena) सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य सावंत यांनी केले आहे. विरोधी पक्षाने पुन्हा तानाजी सावंत यांच्या भाषण विरोधकांनकडून निषेद व्यक्त केला जात आहे.

काही दिवसांपासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरीनंतर ‘निष्ठा यात्रा’ सुरू केली आहे. आदित्य ठाकरेंच्या या ‘निष्ठा यात्रे’च्या दौऱ्यात सातत्याने बंडखोरांना लक्ष्य केले जात आहे. त्याच्या प्रत्यु्त्तरात शिंदे गटाने ‘हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा’ सुरू करण्यात अली आहे. या संपर्क यात्रेसाठी तानाजी सावंत बीडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. तानाजी सावंत यांनी म्हटले की, माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य सावंत यांनी केले. मुख्यमंत्र्यावर टीका करण्याअगोदर तुमचे चारित्र्य तपासा असं म्हणत सावंत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

सभेमधून तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातले, त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली असल्याची टीका मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. शिवसेनेच्या मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी हल्ली बाप पळवणारी टोळी आली असल्याचे टीका केली होती. त्यांच्या टीकेला सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे आम्हाला म्हणतात की तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका. पण, तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता, शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा थेट सवाल सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

हे ही वाचा:

सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस प्रमुख संजय पांडे यांना ताब्यात घेतले

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss