शिंदे – ठाकरे सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात

शिंदे – ठाकरे सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं मुख्यमंत्रीपद वैध आहे की नाही, यावर सुप्रीम कोर्टात (Supreme court) आज महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती, त्यात एकनाथ शिंदेदेखील आहेत. सुप्रीम कोर्टातील घटनापीठासमोर या प्रलंबित याचिकेवर आज सुनावणी आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात आज सकाळी १०:३० वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुभाष देसाई यांनी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी पार पडणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ऑक्टोबर महिन्यात सुनावणी झाली होती. नंतरच्या काळात अनेक सुट्ट्या असल्याने ही सुनावणी १ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. जवळपास एक ते सव्वा महिन्याच्या खंडानंतर सत्तासंघर्षाच्या प्रकरणाबाबत सुनावणी होत आहे. आज घटनापीठासमोर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आमदारांची अपात्रता आणि शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.

या पूर्वी सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची नऊ दिवसांची सुट्टी आणि त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज पुढे जाणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे पुढील सुनावणीसाठी १ नोव्हेंबरची तारीख देण्यात आली होती. राज्यातील सत्तासंघर्षाचा प्रश्न हा २१ आणि २२ जून रोजी सुरु झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. आतापर्यंत तीन बेंचकडे हे प्रकरण गेलं. सुरुवातीला व्हेकेशन बेंचसमोर याची सुनावणी झाली. त्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश एन व्ही रमणा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या बेंचकडे यावर सुनावणी सुरू झाली. त्यानंतर यावर पाच न्यायाधीशांचे एक घटनापीठ तयार करण्यात आलं.

हे ही वाचा :

इलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; सर्व संचालक मंडळ बरखास्त

पुण्यात हॉटेलला भीषण आग; सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version