आमदारांच्या पात्र अपात्रतेवर उद्यापासून होणार सुनावणी

ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांच्या पात्र अपात्रतेवर उद्यापासून सुनावणी होणार आहे. उद्या दिवसभर ही सुनावणी चालणार आहे.

आमदारांच्या पात्र अपात्रतेवर उद्यापासून होणार सुनावणी

ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांच्या पात्र अपात्रतेवर उद्यापासून सुनावणी होणार आहे. उद्या दिवसभर ही सुनावणी चालणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आ हे. या आमदारांचं नक्की काय होणार? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राहणार की जाणार? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात आता नेमके कोणते बदल होणार हे उद्याच्या सुनावणीवर स्पष्ट होणार आहे. तसेच आमदारांच्या पात्र अपात्रतेवरही शिवसेना कुणाची असेल याचा फैसला होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, ही सुनावणी सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. अपक्ष आमदारांच्या पायाखालची जमीन सरकवायला लावणारी ही बातमी आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे सोबतच्या अपक्ष आमदारांनाही अपात्रतेसाठी नोटीस बजावली आहे. अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर, आमदार बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर यांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. या आमदारांचा पूर्वी ठाकरे गटाला पाठिंबा होता. आता शिंदे गटाला पाठिंबा आहे. ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर या आमदारांना ठाकरे गटाने नोटीस बजावली आहे. माजी मंत्री आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दोन दिवसांपूर्वी ही नोटीस मिळाली आहे. अपक्ष आमदारांना अशी नोटीस येणं हे दुर्दैवी आहे. पाठिंबा देऊन, सहकार्य करून देखील नोटीस येत असेल तर हे राजकारणातील चांगलं चित्र नाही, असं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाकडून आम्हाला घाबरवण्यासाठी या नोटीस पाठवल्या जात असाव्यात, अशी शंका व्यक्त करतानाच उद्या स्वतः वकिलांसह विधानसभा अध्यक्षांसमोर उपस्थित राहून या नोटीसला उत्तर देणार असल्याचा सांगितलं जात आहे.

विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील सुनावणीला समोर जाताना ठाकरे गटाची रणनीती नेमकी काय असणार? शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी वकील पत्र अध्यक्षांकडे सादर केला आहे ज्यामध्ये दोन पानी आपलं लेखी म्हणणं वकिलांच्या मार्फत मांडला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील देवदत्त कामत आणि वकील असीम सरोदे यांच्यामार्फत वकीलपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आला आहे हे वकील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू मांडतील. याआधी ठाकरे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांनी दिलेल्या नोटिशीला वकिलांमार्फत वैयक्तिकरित्या ५०० पानी लेखी उत्तर दाखल केलं होतं. अगदी तशाच प्रकारे सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या १४आमदारांनी वकील पत्रात आपलं लेखी म्हणणं अध्यक्षांकडे सादर केलं आहे. उद्या सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या आमदारांची पुन्हा एक बैठक होईल आणि त्यानंतर बारा वाजता ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहतील. यामध्ये सुनावणी दरम्यान ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकीलच आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील. अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना सुनावणी दरम्यान आपलं म्हणणं मांडण्यास विचारले गेल्यास आमदार आपली भूमिका मांडतील.

हे ही वाचा: 

संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका …

शरद पवारांच्या निवासस्थानी I.N.D.I.A. आघाडीच्या कोऑर्डिनेशन कमिटीची पहिली बैठक आज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version