spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आमदार अपात्रतेबाबत Supreme Court मध्ये होणार सुनावणी ; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

जेव्हा पासून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली त्यांनतर हे प्रकरण मोठ्याप्रमाणावर गाजत होते. ते म्हणजे खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची ? यावरून हे प्रकरण कोर्टात गेले होते. शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला होता. राहुल नार्वेकरांनी बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला, तर दोन्ही पक्षांच्या आमदारांपैकी कोणालाही अपात्र ठरवले नाही. त्यामुळे ठाकरे गटाने (Thackeray Group) या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली तर शिवसेनेनेही ठाकरे गटाचे आमदार का अपात्र ठरवण्यात आले नाहीत.

नक्की काय आहे हे प्रकरण ?

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात महत्त्वाचं ठरलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला होता. आमदार अपात्रता प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयानं काही निकष देखील घालून दिले होते. राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निकाल देताना शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. तर, जुलै २०२३ मध्ये शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यावेळी देखील राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आज (६ ऑगस्ट) होणार सुनावणी ? 

राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने दाखल केली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार यांच्या गटाला नोटीस जारी केली होती. त्यामुळे सुनावणीत अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नोटीशीला उत्तर दिलं आहे का.. ते पाहावं लागणार आहे. ही सुनावणी दिल्लीत होत असताना उद्धव ठाकरे देखील दिल्लीत आहेत. ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

हे ही वाचा:

ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी MSRTC आणला ‘हा’ नवा उपक्रम

“ज्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जिंकण्याची उर्मी आहे अशा ..” Devendra Fadnavis यांनी दिले कार्यकर्त्यांना आश्वासन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss