spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मी केलेल्या कामाचे श्रेय Goval Padvi यांनी घेऊ नये: Heena Gavit

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील (Nandurbar Loksabha Constituency) नवीन खासदारांना आता पाच वर्षे कामे करण्याची संधी आहे. या पाच वर्षात त्यांनी नवीन संकल्पना आणून कामे मंजूर करून नवीन कामाचे श्रेय घ्यावे आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करू नये, असा टोला माजी खासदार तथा भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांनी खासदार गोवाल पाडवी (Goval Padvi) यांना सोमवारी (९ सप्टेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.

नंदुरबार लोकसभेचे नवनियुक्त खासदार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वेस्थांनकाची पाहणी केली व अधिकार्‍यांना कामा संदर्भात सूचना केल्या परंतु ज्या कामाची पाहणी खासदारांनी केली ते कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून मी खासदार असतानाच मंजूर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या अमृतभारत स्टेशन अंतर्गत नंदुरबार स्थानकाचा समावेश करण्यात आला होता .या योजनेच्या माध्यमातून 11.50 कोटी रुपये रेल्वे विभागामार्फत रेल्वे स्थानका साठी मंजूर करण्यात आले आहेत .यात एक व दोन प्लॅटफॉर्मवर ऑटोमॅटिक पायऱ्या बसवणे, प्लॅटफॉर्मवर लिफ्ट सुविधा उपलब्ध करणे, रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूस नवीन इमारत तयार करून तिथे नवीन तिकीट खिडकी तयार करणे तसेच चार नंबरच्या प्लॅटफॉर्मची निर्मिती अंतर्गत होणार आहे .

“नंदुरबार रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन अंतर्गत समावेश झाल्याने हे काम मी खासदार असतानाच मंजूर झाले आहेत. त्या संदर्भात टेंडर प्रोसेसिग ही करण्यात आली आहे व लवकरच या कामाला सुरुवात होऊन येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण होतील. परंतु आताचे खासदार हे या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहे. म्हणून खासदारांनी श्रेय न घेता नवीन संकल्पना आणून जनतेला रेल्वेच्या माध्यमातून नवीन सोयी सुवीधा उपलब्ध करून द्याव्यात आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊन लोकांची दिशाभूल करू नये,” असे मत मा खा.डॉ. हिना गावित यांनी बोलताना व्यक्त केले.

हे ही वाचा:

नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास तातडीने पाऊले उचलण्याचे CM Eknath Shinde यांचे निर्देश

अमित शाहांच्या दौऱ्यात अजित पवार अनुपस्थित…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss