Uddhav Thackeray Vs Gauri Bhide, उद्धव ठाकरेंना उच्च न्यायालयाचा दिलासा

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची मालमत्ता किती आहे? ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी या संदर्भात गौरी भिडे ( Gauri Bhide) यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Uddhav Thackeray Vs Gauri Bhide, उद्धव ठाकरेंना उच्च न्यायालयाचा दिलासा

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची मालमत्ता किती आहे? ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी या संदर्भात गौरी भिडे ( Gauri Bhide) यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत कोरोना काळात सामना या वृत्तपत्राला इतका फायदा कसा झाला? प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्रोत काय आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (uddhav thackeray) असताना व आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) पर्यावरण मंत्री असताना २०२० ते २०२२ या कोरोना काळात सामना (Samana) वृत्तपत्राचा टर्न ओव्हर ४२ कोटी इतका होता, ज्यात साडेअकरा कोटींचा नफा झाला. ठाकरे कुटुंबीयांचा उत्पन्नाचा नेमका स्रोत काय? या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी अशा मागणी याचिकाकर्त्या गौरी भिडे यांनी केली होती.

गौरी भिडे यांच्याकडून दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने गौरी भिडे यांना धक्काही दिला आहे. भिडे यांना न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. गौरी भिडे या स्वतः एक प्रकाशक असून राजमुद्रा हे त्यांच्या प्रकाशनाचे नाव आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा :

Sheetal Mhatre Viral Video, शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी वरून सरदेसाई यांचा नवा खुलासा

Asia First Woman Loco Pilot | वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या सारथ्य करणाऱ्या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या सुरेखा यादव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version