spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Himachal Pradesh Assembly Election 2022 हिमाचलमध्ये भाजपला काँग्रेसची ‘काँटे की टक्कर’ भाजप ३६ तर काँग्रेस…

हिमाचल प्रदेशातील जनतेने पुन्हा एकदा आपले पत्ते खेळले आहेत. येथील मतदारांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण केली आहे. सर्वात मनोरंजक लढत हिमाचल प्रदेश विधानसभेत (Himachal Pradesh Assembly Election) आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशात एकूण ६८ जागा आहेत. यातून कधी भाजप पुढे होते, तर कधी काँग्रेस. सकाळी ९ वाजेपर्यंत भाजप ३२ जागांवर तर काँग्रेस (Congress) ३३ जागांवर आघाडीवर आहे. तर आता काँग्रेस हिमाचालमध्ये भाजप (BJP) ३३ जागांवर आहे तर काँग्रेस ३४ जागांनी आघाडीवर आहे. ही लढत जोराची होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने अशीच आघाडी ठेवली तर हिमाचालमधील राजकीय दृश्य बदलण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Gujarat Election Result 2022 गुजरातमध्ये भाजपनं शतक गाठलं १२२ तर, काँग्रेस – ४७ व आप – ३ 

हिमाचल प्रदेशात भाजपने गेल्यावेळी ४४ जागा मिळवल्या होत्या. तसेच जयराम ठाकूर हा नवीन चेहरा दिला होता. हिमाचल प्रदेशात सत्ता स्थापण्यासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर काँग्रेस पहिल्यांदा ही निवडणूक लढवत आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशच्या मतदानानंतर सर्वच एक्झिट पोलमध्ये हिमाचल प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेस आणि भाजपमध्ये टफ फाईट होताना दिसत आहे. काँग्रेसच्या या अनपेक्षित यशामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Gujarat Assembly Election 2022 Result गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार, मतमोजणीला सुरुवात, गुजरातमध्ये भाजप ९० जागांवर आघाडी

ही हिमाचल प्रदेशच्या एक्झिट पोलची आकडेवारी पाहता भाजपा काठावर पास होण्याची शक्यता आहे. तसेच सत्तेसाठी इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसही त्याच आसपास असल्याने काँग्रेसलाही सत्ता स्थापन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss