spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिंगोलीत महायुतीने उमेदवार बदलला, Hemant Patil ऐवजी Baburav Kadam Kohalikar यांना उमेदवारी

हिंगोली मतदारसंघातीळ उमेदवारावरून महायुतीत वाद असल्याचे बोलले जात होते. यामुळेच, हेमंत पाटील यांची उमेदवारी शिंदे गटाकडून काढून घेण्यात आली असून बाबुराव कदम कोहळीकर यांना देण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर हिंगोली मतदारसंघातुन (Hingoli) महायुतीने विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचा पत्ता कट केला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर (Baburav Kadam Kohalikar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघातीळ उमेदवारावरून महायुतीत (Mahayuti) वाद असल्याचे बोलले जात होते. यामुळेच, हेमंत पाटील यांची उमेदवारी शिंदे गटाकडून काढून घेण्यात आली असून बाबुराव कदम कोहळीकर यांना देण्यात आली आहे.

महायुतीत भाजपकडून शिवसेना शिंदे गटावर काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात होते. हिंगोली मतदारसंघातील जागादेखील त्यापैकीच एक होती. भाजपकडून असलेला दबाव लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना वगळून नव्या उमेदवाराला लोकसभेचे तिकीट दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या निर्णयामुळे खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हेमंत पाटील यांच्यावर मतदारसंघात मतदारांची नाराजी असल्याने त्यांना ऐनवेळी तिकीट नाकारल्याचे बोलले जात आहे. नवीन उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांचा एबी फॉर्म भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची शक्यता वार्तांवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासुनच हिंगोलीच्या या जागेवरून मुंबईत राजकीय वातावरण तापले होते. हिंगोली मतदारसंघासोबतच, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ-वाशीम मतदारसंघातही जागावाटप आणि उमेदवारांबाबतीत महायुतीत तिढा कायम आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार बदलण्यासाठी शिंदे गटावर दबाव असल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघातून भावना गवळी यांच्या ऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांच्यापैकी कोण निवडणूक लढवणार? याबाबत महायुतीत वाद आहेत. याशिवाय, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरूनही भाजप आणि शिंदे गटात तिढा कायम आहे.

हे ही वाचा:

Sanjay Nirupam यांचा Congressला बाय बाय… Loksabha Elections पूर्वी MVAला मोठा धक्का

Loksabha Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे २१ उमेदवार जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss