spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, खासदार संजय राऊतांची मागणी

देशात बॅलेट पेपरवर निवडणुका (Election) घ्या, ईव्हीएमवर नको, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

देशात बॅलेट पेपरवर निवडणुका (Election) घ्या, ईव्हीएमवर नको, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ईव्हीएम आहे तर सर्व मुमकीन आहे. EVM मशीन वरती मोठा कॉन्फिडन्स आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ईव्हीएम आहे तर सर्व मुमकीन आहे. EVM मशीनवर मोठा कॉन्फिडन्स आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका लढवा तुम्ही ते ऐकत नाही कारण तुम्ही हरणार आहे. तुम्ही स्वतःला महाशक्ती मानत आहात इतर देशात बॅलेट पेपरवर निवडणूक होतात या ठिकाणी तुम्ही निवडणुका बॅलेट पेपरवर का घेत नाहीत? असे संजय राऊत म्हणाले.

यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज मंत्री आहेत. भाजप सत्तेत नसताना ते विरोधी पक्षात होते, विरोधकांच काम आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे जर प्रश्नांचं उत्तर मिळत नाही तर आम्ही उभं राहून प्रश्न विचारणार तो संविधानाने दिलेला आम्हाला हक्क आहे. अमित शहा यांनी संसदेत येऊन संसदेत घुसखोरी कशी झाली याचं उत्तर त्यांनी द्यावं तर ते त्याची उत्तर बाहेर देतात. नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सुनील केदार हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. लढवय्ये नेते आहेत भाजपचे असे अनेक नेते आहेत .त्यांच्यावरती असे अनेक खटले चालले पाहिजेत, कारवाया झाल्या पाहिजे पण न्यायालयावर दबाव असल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवाया होत आहेत त्यांच्याच आमदारकी रद्द होत आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज आणि उद्या दोन दिवस ते नाशिकमध्ये असणार आहेत. सुधाकर बडगुजर यांची चौकशी चालू असताना संजय राऊत नाशिकमध्ये गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. संजय राऊतांचे सुधाकर बडगुजर हे निकटवर्तीय आहेत. बडगुजर यांची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबतची पार्टी आणि पदाचा गौरवापर करून महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगेच्या सभेपूर्वी बीडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या

MAHARASHTRA: पुरे झाली मन की बात, आता हवी जन की बात…AMOL KOLHE यांचे जनतेला आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss