Saturday, August 31, 2024

Latest Posts

माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि किती….Manoj Jarange यांचा Prasad Lad यांच्यावर पलटवार

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय, असे म्हणत भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीकास्त्र उगारले. ६० वर्षांत जे होऊ शकलं नाही ते देवेंद्रजींनी केलं! मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले! जरांगे पाटील कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करत आहेत?, हा संशोधनाचा विषय असल्याचे प्रसाद लाड म्हणाले होते. त्यावर आता मनोज जरांगे-पाटील यांनी उत्तर दिलं आहे. माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायलं लाऊ नको, तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेत असं मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत, आता मराठे आमदार आणि मंत्री मराठ्यांच्याच अंगावर घालत मजा पाहत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

मराठा आरक्षणावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना जरांगे संतापले. ते म्हणाले की, हा कोण बांडगुळ आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे. तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेस. मी तुला काय म्हटलंय का? तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाट नाहीतर काही कर, आमच्या नादी लागू नकोस. तुम्ही मोठे लोक आमच्या जातीसाठी भूषण होता, आता तुम्ही नीच निघाला. मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं केल्याचा जाब प्रसाद लाड यांनी विचारावा असं म्हणत मनोज जरांगे म्हणाले की, ठाण्याच्या पोलिस भरतीत तिथल्या एसपीने कुणबी सर्टिफिकेट असलेल्या ४०० ते ५०० मुलांना बाहेर काढलं आणि ओपनमध्ये टाकलं. त्यावर प्रसाद लाडने देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला पाहिजे. 

ओपनमध्ये जा नाहीतर रिजेक्ट करतो अशी धमकी ठाण्याच्या एसपीने दिलीय. मग कशाला प्रमाणपत्र दिलंय? प्रमाणपत्र नसणाऱ्यांना आत घेताय. भंगार लोक आयएएस अधिकारी झालेत आणि प्रमाणपत्र असणाऱ्यांना बाहेर काढलं गेलं. तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर. माझ्या मुलांचं वाटोळं झालंय त्याचा जाब विचार. मुलींना शिक्षण मोफत जाहीर केलं, मग त्यात कशाला अटी घातल्या असा सवाल जरांगे यांनी विचारला. मोफत शिक्षणाची घोषणा केली तर ते विनाअट करा ना, त्यासाठी व्हॅलिडिटीची अट कशाला पाहिजे असं जरांगे म्हणाले. जरांगे पाटील साहेब, तुम्हाला माहिती देणारे चुकीची माहिती देतात! आम्ही तुमचं आवाहन स्वीकारायला तयार आहोत!, परंतु तुम्ही चर्चेला तयार आहात का? आम्हाला तुमचा अभिमान आहे, परंतु एका विशिष्ठ व्यक्तीला टार्गेट करणे चुकीचे आहे. समाजासाठी लढायचे असेल तर चर्चेतून मार्ग काढणे आवश्यक असल्याचे प्रसाद लाड म्हणाले होते.

हे ही वाचा:

दिव्यांगांच्या उपक्रम अनुदानाचे शासनाचे धोरण जाहीर, Disability Welfare Department चा निर्णय

अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी Radhakrishna Vikhe-Patil यांचे निर्देश, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss