spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आजोबा, वडील किंवा काकांपासून जे संस्कार मिळाले, त्यामुळे मी अत्यंत हार्डकोअर, कट्टर मराठी आहे; राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्म यावर आपले परखड मतप्रदर्शन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ओटीटीनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मात्र आता ओटीटीवर सेन्सॉरशिप आणली जाणार असे बोलले जाऊ लागले आहे. येणाऱ्या काळात ओटीटी आणि त्यावरील सेन्सॉरशिप कशी असेल यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ज्यामुळे ते चर्चेत आले आहे. अथांग मराठी सीरिजच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी राज यांनी मराठी चित्रपट आणि त्याविषयीची भूमिका राज यांनी मांडली आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी सीरिजवाला माणूस नाही. पण मी २-४ सीरिज आतापर्यंत पाहिल्यात. ‘अथांग’ सीरिजही बघणार आहे. मी फिल्मवाला माणूस आहे. २-३ तासांत जे काही सांगायचं ते सांगून द्या. खरं तर मी एकटाच मराठी माणसाच्या पाठीमागे उभा आहे, असं नाही. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतो. माझ्या घरात मला आजोबा, वडील किंवा काकांपासून जे संस्कार मिळाले, त्यामुळे मी अत्यंत हार्डकोअर, कट्टर मराठी आहे. त्यामुळे मला जिथे शक्य असतं तिथे तिथे मी मराठी माणसांसाठी उभा राहतो. मी कोणावरही उपकार करत नाही. मला शक्य असेल तितकं माझं कर्तव्य पार पडण्याचा प्रयत्न करतो,” असं भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

राज ठाकरेंनी याठिकाणी बोलताना वेब सीरिजच्या सेन्सॉरशिपबद्दलही मत नोंदवलं. ते म्हणाले, सीरिजमध्ये तुम्ही काय दाखवणार आहात, हे महत्त्वाचं असतं. काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राने एक सीरिज लावली होती. त्यात फक्त व्याकरणापुरतं मराठी होतं. बाकी बऱ्याचशा शिव्या होत्या. किती शिव्या द्यायच्या, यालाही मर्यादा असावी. आपण परदेशातील अनेक गोष्टींचं अनुकरण करतो, पण इतक्या वर्षांनंतरही आपल्याकडे लोकशाही रुजायची आहे. मोकळेपणा नक्कीच यायला हवा, पण ती सीरिज किंवा चित्रपटांची गरज असावी. गरज असताना तिथे कोणतीही बंधनं नसावी, असंही राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : 

वरून सरदेसाईंच्या मनधरणीमुळे युवासेनेच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी घेतलं राजीनामा माघे

जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; राजकीय चर्चेला उधाण

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss