Tuesday, July 2, 2024

Latest Posts

“आठवी पास असल्याचा मला अभिमान आहे ..” ; Narendra Mehata यांनी दिली प्रतिक्रिया

"नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियावर जो फोटो पोस्ट केला होता त्यामध्ये त्यांच्या बोटावर मतदानाची शाई दिसत आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना मेहता यांनी म्हटले की, पदवीधर निवडणुकीवेळी उजव्या हातावर शाई लावली जाते. मी पोस्ट केलेल्या फोटोत माझ्या बोटावर मतदानाची शाई दिसत आहे

२७ जून २०२४ रोजी मुंबई येथे राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरूझाले आहे. आजचा या १५ व्य विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. हे अधिवेशन आजच्या दिवशीसाठी स्थगित करण्यात आले. यात आज शोकसभा घेण्यात आली. तसेच राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे सांगण्यात आली. महायुती सरकारचे हे अधिवेशन सध्या घडीला चर्चेचा विषय बनले आहे. सदर पावसाळी अधिवेशन शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. आजचे हे पावसाळी अधिवेशन सुरू होताच वादळी बनल्याचे दिसले. यासाठी सर्वात महत्वपूर्ण प्रश्नांची चर्चा करण्यात आली होती. पहिलीच विषय होता इंदिरा गांधींच्यावेळी (Indira Gandhi) लागू झालेल्या आणीबाणीचा ज्यामुळे संपूर्ण सभागृहात गदारोळ मजला. त्यांनतर पहिल्याच दिवशी जोरदार हल्लाबोल करत विरोधक आक्रमक झाले.

अश्यातच काल म्हणजे २६ जून रोजी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी अनेकांनी आपापले मते दिली. त्यापैकी सर्वात महत्वाचे एक मत प्रचंड गजल ते म्हणजे नरेंद्र मेहता याचे मत. केवळ आठवी पास असतानाही भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी (Konkan graduate constituency election) मतदान केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यावरून राजकीय नाट्यात नवे वळण आले. आता नरेंद्र मेहता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “फक्त फोटो देण्यासाठी मी मतदान केल्याची पोज दिली, मी मतदान केलं नसल्याचं” नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केलं. “आठवी पास असल्याचा मला अभिमान आहे. आपण २,००० लोकांना रोजगार दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकारच्या अफवा पसरवून आपली बदनामी केली जात असल्याचा” आरोपही त्यांनी केला.

नक्की काय म्हणाले नरेंद्र मेहता :

“काही माध्यमांमधून माझी बदनामी केली जात आहे. पदवीधर मतदारसंघाचं मततदान होत होते  त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत फोटो काढताना ती पोझ दिली. मी मतदान केलयं असं कुठेही म्हटलेल नाही. पदवीधर मतदारसंघाचं मतदान करताना बोटाला शाई ही उजव्या हाताला लावली जाते आणि मी मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी कार्यकर्त्यासोबत डावा हात दाखवत होतो. मला अभिमान आहे मी आठवी पास असल्याचा, मी दोन हजार जणांना नोकऱ्या दिल्या.”

“बुधवारी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती. निवडणुकीवेळी आम्ही अनेकदा फोटो पोस्ट करत असतो. एका पत्रकाराने बातमी दिली की, मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. पदवीधर निवडणुकीत शाई ही डाव्या नव्हे तर उजव्या हातावर लावली जाते. या निवडणुकीत मतदान करायला निवडणूक यादीत तुमचे नाव असणे गरजेचे असते. माझी बदनामी करण्यासाठी खोट्या बातम्या छापल्या जात आहेत. मी एरवी बोलत नाही, पण लोकांमध्ये गैरसमज पसरु नये म्हणून बोलावे लागत आहे.”

बोटावर शाई कशी आली असे विचारले असता ते म्हणाले की –

नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियावर जो फोटो पोस्ट केला होता त्यामध्ये त्यांच्या बोटावर मतदानाची शाई दिसत आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना मेहता यांनी म्हटले की, “पदवीधर निवडणुकीवेळी उजव्या हातावर शाई लावली जाते. मी पोस्ट केलेल्या फोटोत माझ्या बोटावर मतदानाची शाई दिसत आहे, मात्र ती शाई डाव्या हाताच्या बोटावर होती, ही शाई लोकसभा निवडणुकीवेळी लावण्यात आली होती” असे नरेंद्र मेहता यांनी सांगितले.

एकंदरीतच त्यांच्या या व्हायरल फोटोमुळे जे लोण पसरले होते, त्यामुळे जे राजकीय नाट्य घडत होते त्याला कायमचा पूर्णविराम मिळालेला आहे. त्यामुळे कोणीही त्यांच्या विषयीची अफवा पसरवू नये असे आवाहन  केले आहे.

हे ही वाचा

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना.. 

MAHARASHTRA ASSEMBLY MANSOON SESSION 2024 : “मतभेद असावेत परंतु मनभेद असू नयेत..” ; आजच्या अधिवेशनातील घटनांवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss