spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ED च्या कारवाईसाठी मी तयार..Rahul Gandhi यांच्या ट्विटवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, अधिवेशनातील ‘चक्रव्यूह’ गांधींना अडकवणार?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय बनले आहे संसदेमध्ये आपण केलेले भाषण दोघांमधील एकाला आवडले नाही चक्रव्यूहचा संदर्भ घेऊन केलेल्या भाषणामुळे आपल्यावर ईडी कारवाईची शक्यता असल्याचे राहुल गांधी यांनी ट्विटमार्फत म्हटले आहे. यासोबतच ईडी (ED) मधील काही सूत्रांनी आपल्यावर कारवाई होणार असल्याची माहिती दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी ट्विटमधून केला आहे.

काय आहे राहुल गांधी यांची पोस्ट?

राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, दोघांपैकी एकाला माझे चक्रव्यूहचे भाषण आवडले नाही. ईडीमधील आतील सूत्रांनी मला सांगितले की, तुमच्यावर छापेमारी केली जाणार आहे. त्या संदर्भात योजना तयार केली जात आहे. मी तयार आहे. ईडीची वाट पाहत आहे. चहा आणि बिस्किटे माझ्याकडून असणार आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

29 जुलै रोजी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य केले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, देशातील शेतकरी, मजूर आणि तरुण यांच्यात भीतीचे वातावरण आहे. महाभारतातील युद्धाच्या चक्रव्यूहचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला होता. महाभारतातील युद्धात सहा जणांनी अभिमन्यूला मारले होते. आता नवे चक्रव्यूह तयार केले जात आहे. ते चक्रव्यूह कमळाच्या आकाराचे होते. त्या कमळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी छातीवर घेऊन फिरतात. अभिमन्यूला कर्ण, कृपाचार्य, कृत वर्मा, अश्वस्थामा, शकुनी आणि द्रोण अशा सहा जणांनी मारलं. आजही चक्रव्यूहामध्ये सहा लोक आहेत. त्यावेळी सारखे आज सुद्धा सहा लोक आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संघप्रमुख मोहन भागवत डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत. हे सहा जण सर्व काही कंट्रोल करत आहेत, असं भाष्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधींच्या या विधानावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी आक्षेप घेतला होता. त्यासोबतच त्यांनी राहुल गांधी यांना आठवण करून दिली होती की या सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तींचे नाव घेऊ नये.

हे ही वाचा:

Big Boss Marathi Season 5: योगिता चव्हाणच्या डोळ्यात आले पाणी ….कारण काय?

Uran Murder Case: आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी!

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss