मी लढण्यासाठी कंबर कसली असून धनंजय मुंडेंना सोडणार नाही; करुणा शर्मा

मी लढण्यासाठी कंबर कसली असून धनंजय मुंडेंना सोडणार नाही; करुणा शर्मा

एका वर्षापूर्वी बीडमध्येच सत्तेचा वापर करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता या बीड शहरातच राहून जनतेच्या प्रश्नांना मी हात घालणार आहे. त्याशिवाय मी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना देखील सोडणार नाही, असा इशारा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी दिला आहे.

बीड येथे आलेल्या करुणा शर्मा माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या की, गेल्यावर्षी याच बीडमध्ये मला एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते. त्यामुळे मी निर्णय घेतला असून, या घाणीत उतरूनच ही घाण साप करणार आहे. माझ्यावर जो अन्याय झाला आहे, त्याविरुद्ध येथे येऊन मी लढणार आहे. त्यासाठी मी बीडमध्ये घर खरेदी केला असून, धनंजय मुंडे यांना सोडणार नसल्याचं करुणा शर्मा यावेळी म्हणाल्यात. पुढे बोलतांना त्या म्हणाल्यात की, धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी मी कंबर कसली असून, त्यांनी देखील आपली कंबर कसून घ्यावी असं करुणा शर्मा म्हणाल्या आहे. त्यामुळे आज बीडमध्ये घर घेतलं असून, बीडचे लोकं माझ्यासोबत आहे. बीडच्या जनतेने नेहमी न्याय दिला आहे. फक्त मलाच नाही तर आपल्या अनेक कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे यांनी खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकले आहे. त्यामुळे ते सर्व लोकं माझ्यासोबत असल्याच देखील करुणा शर्मा म्हणाल्यात. दरम्यान यावेळी बोलतांना करुणा शर्मा यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी गेल्या वर्षी केला होता. त्यांच्यापासून आपल्याला अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही करुणा यांनी केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याचा स्वीकार केला. दुसरीकडे, करुणा शर्मा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारीही केली आहे. दरम्यान, करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ‘प्रेम कहाणी’ मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरु असल्याचं करुणा शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. आमच्या दोघांवर सिनेमा काढल्यावर तो हिट होईल असं वक्तव्यही त्यांनी यापूर्वी केलं होतं. आमच्या प्रेम-कहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्प्यात असून त्यातून अनेक पुरावे समोर आणणार असल्याचे शर्मा यांनी सांगितलं होतं.

हे ही वाचा :

Aditya Thackeray : ‘महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे’ ; फडणवीसांच्या आरोपाला ठाकरेंचे प्रत्युत्तर

‘एकनाथ शिंदे अडचणीत आलेत’ ; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version