spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘… जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी मंत्री झालो’, दीपक केसरकारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

आज शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत बोलताना शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी केली त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. या आरोपांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.

आज शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत बोलताना शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी केली त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. या आरोपांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray ) उत्तर देण्यासाठी मी मंत्री झालो नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी मंत्री झालो अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. त्याला प्रत्युत्तर दीपक केसरकरांनी दिलं आहे. आपण मंत्री म्हणून काय काम केलं ते सांगत राज्यभर दौरा करा. मंत्री असताना केलेल्या कामगिरीनंतर किती लोक तुम्हाला साथ देतात हे कळेल. महाराष्ट्राला दिशा द्यायाची असेल तर तसं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं पाहिजे. आमचं ठाकरे कुटुंबींयावर प्रेम आहे मात्र अशाप्रकारे जर काहीही बोलून राजकारण करत आहेत आमच्यासारख्या कार्यकर्त्या असलेल्यांना बोलावं लागतं. ज्यांनी अनेक वर्ष राजकारणात काम केलं त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करुन द्यावी लागते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सभेतील जल्लोष आणि मतदान यात फरक असतो. हा फरक आदित्य ठाकरे यांनी समजून घेतला पाहिजे. नेता हा मंचावरुन वेगवेगळे आरोप करण्यासाठी नसतो. गद्दार, खोके म्हणण्यासाठी नसतो तर नेता हा राज्याचा विकास करण्यासाठी असतो. जे नेते विकास करतात ते जल्लोष करत फिरत नाही. जनतेच्या भावना भडकवून त्यांच्यावर राज्य करण्याचा एक काळ होता. मात्र आता तो काळ उरला नाही आता जनतेला त्यांचं हित समजतं. त्यामुळे पीढिला भडकावण्याचं काम करु नये, असं देखील ते म्हणाले

तुम्ही महाराष्ट्रातील तरुणाईला चुकीच्या मार्गाने नेऊ शकता. घोषणाबाजी करु शकता मात्र त्यांना तुम्ही भविष्य देऊ शकत नाही. तरुणांच्या भविष्याचा विचार करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे. जो पक्ष किंवा नेते तरुणांच्या भविष्याचा विचार करु शकत नाही त्यांना राजकारणात राहण्याचा हक्क नाही. आहे. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही नेते पूर्ण वेळ देतात आपलं काम करतात. घरात बसून राज्य चालवायचे दिवस गेले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती वेळ मंत्रालयात आले आणि आदित्य किती वेळा आले, हे आपल्याला माहित आहे. उद्धव ठाकरे आजारी होते पण आदित्य याचं काय?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Latest Posts

Don't Miss