मंत्रिमंडळाचा विस्तार फार लवकर होईल असं वाटत नाही, अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे आज औरंगाबादमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी शिंदे गटावर चांगलाच हल्लबोल हा केला आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार फार लवकर होईल असं वाटत नाही, अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे आज औरंगाबादमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी शिंदे गटावर चांगलाच हल्लबोल हा केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेना कोणाची याबाबत न्यायालय (Court) आणि निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरु आहे. उया सुनावणीचा अजूनही अंतिम निकाल आलेला नाही. मात्र त्यापूर्वीच निकाल आमच्या बाजूला लागणार असल्याचे शिंदे गटाकडून (Shinde Group) सांगण्यात येत असेल तर शंकेला वाव असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

तसेच यावेळी माध्यमांशी बोलताना आंबादास दानवे म्हणाले, शिवसेना हा पक्ष कोणाचा आहे याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तर न्यायालयात प्रकरण सुरु असल्याने मंत्रीमंडळ विस्तार होणार नसल्याचं देखील दानवे म्हणाले आहे. औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते. शिवसेना पक्ष कोणाचा आहे याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. कोर्टात सुनावणी ही चालू आहे. १६ लोकांनी पक्ष भंग केला आहे. त्यामुळे कारवाई होईल किंवा न्यायालय काय निकाल देईल हे सांगता येत नाही. यामुळे मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही. तसेच सुनावणी सुरु असताना आधीच निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा करत असतील तर शंकेला वाव असल्याचं दानवे म्हणाले. तसेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार १६ जणांवर कारवाई व्हावी हाच कायदा असल्याचं देखील उल्लेख दानवे यांनी केला.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की त्यांना जेल मध्ये टाकण्याचा काहीही अस नव्हतं, असे षडयंत्र भाजप करते, ईडी च्या माध्यमातून भाजपने हे असले प्रयत्न केले आहे. उद्धव ठाकरे अतिशय सांमज्यसाने काम करतात असे हे नेतृत्व आहे. त्यांच्या पक्षातील ५० लोक निघून गेले मात्र मुख्यमंत्र्यांनी वजन वापरलं नाही ते वापरू शकत होते आरोपात तथ्य नाही. असं देखील यावेळी आंबादास दानवे म्हणाले आहेत.

Exit mobile version