‘सहसा माझ्या डोळ्यात पाणी येत नाही पण…’ ; राज ठाकरे

‘सहसा माझ्या डोळ्यात पाणी येत नाही पण…’ ; राज ठाकरे

अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच स्पेशल पार पडले आहे . लोअर परळ येथील PVR मध्ये या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन केले होते.या स्क्रिनिंगला अनेक मराठी सिनेसृष्टीतल्या दिग्गज कलाकारांनी तसेच नेते मंडळींनी हजेरी लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

हर हर महादेव या चित्रपटाचा टिझर काहीदिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या टिझरला नेटकऱ्यांकडून भरपूर पसंती मिळाली.आणि कालच्या लोअर परळ येथील PVR मध्ये झालेल्या हर हर महादेव या चित्रपटाचा स्पेशल शो पाहण्यासाठी राज ठाकरेंही उपस्थित होते. हर हर महादेव हा चित्रपट पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, ‘चित्रपट निर्मितीसाठी केलेली मेहनत या चित्रपटात दिसत आहे. खूप वर्षांनी उत्तम डायलॉग असलेला चित्रपट पाहिला. मी आनंद चित्रपट पाहताना भावूक झालो होतो. सहसा माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. पण या चित्रपटातील काही प्रसंग पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट पाहिला पाहिजे.

अभिनेता शरद केळकर हा या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून झी स्टुडियोजच्या माध्यमातून भारतभरात प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच अभिनेता सुबोध भावे हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अमृता खानविलकर ‘हर हर महादेव’ या चित्रपटात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची अर्थात सोनाबाई देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे ही वाचा :

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी विमानाचं टेकऑफ लांबवलं? – आयुष्मान खुराणा

१०० हून अधिक खासदारांचा ऋषी सुनक यांना पाठिंबा ; पंतप्रधानपद जवळपास निश्चित

“मी तुझ्यासाठी गोळीही झेलली असती,” हार्दिक पांड्याने विराट कोहलीशी गप्पा मारताना मन केले मोकळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version