spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुरावे होते म्हणून बोललो मी हवेत गोळीबार करत नाही, Nilesh Rane यांचा खळबजनक दावा। Exclusive

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात नवनवीन घडामोडी घडत आहेत. राजकीय वर्तुळात मोठ्याप्रमाणावर चर्चा रंगत आहेत. ही निवडणूक येईपर्यंत अनेक पैलू उलगडताना दिसत आहेत. अशातच टाईम महाराष्ट्रचे(Time Maharashtra) संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांनी देशाचे माजी खासदार निलेश राणे यांची फेस टू फेस मुलाखत घेतली आहे. यंदा विधानसभेच्या निवडणूक युध्दातच स्वतःचा राजकीय वनवास संपवण्यासाठी डॅा. निलेश राणे उत्सुक आहेत. कुडाळ- मालवण मतदार संघात सध्या ठाकरेंचे वैभव नाईक आमदार आहेत. अश्या स्थितीत पुन्हा कमबॅक करण्यास उत्सुक असलेल्या निलेश राणेंना ‘ व्हिलन’ ठरवणं हा कोकणातला अजेंडा बनवला गेलाय. त्याबद्दल सांगतायत स्वतः माजी खासदार निलेश राणे. दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतला कोणी आणि का मारले ? प्रश्नावर Nilesh Rane यांचा गौप्यस्फोट करत याही विषयाला हात लावला आहे. जाणूयात ते नेमके काय म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले निलेश राणे ?

“राणेंच घर पाडण्यासाठीसुद्धा ठाकरे आले होते. तुम्ही कोणत्याही लढाईला पर्सनल काराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. असं ठाकरे यांनी केलं आहे. अगदी मीडियातसुद्धा आलं आहे. ५०, ६० अधिकाऱ्यांसकट घर पडायला येता, कोर्टात माणसं तयार करत असाल, मीटिंगमध्ये BMC कमिश्नर यांच्यासोबत माझा किंवा राणे परिवाराचाच विषय करत असाल, कूच्छ भी करो राणेंना अडकवा, कधीच आम्ही वाईट चिंतलं  नाही. त्यांनी जर वाईट चिंतलं तर आम्ही का मागे राहायचं. मोर्चा काढला त्यावेळी आम्ही ३ घही पुरुष घरी नव्हतो. आम्ही गाफील होतो. घरात कोणी नसताना ५००, ६०० जणांना घेऊन येता हे कितपत योग्य आहे. आम्ही आरोप नाही करत आमच्या कडे पुरावे असतात. दिशा सालियन ला मारलं पुरावा आहे, सुशांतला मारलं पुरावा आहे. CDR रिपोर्ट काढा तेव्हा आयोग कोण होता सचिन वाझे सुशांत च्या केस मध्येसुद्धा तोच सचिन वाझे होता. CDR कुठ्येत नाही आहेत, दिशा सालियनची बॉडी जाळली, एवढी घाई काय होती ? पोस्टमोटम कसा होणार. फॉरेन्सिक डमी आणलं त्याने सत्यता थोडीच समजणार.. आम्ही बोलतो पण पुराव्यानिशी बोलतात.  पण ठाकरे नेहमी असच करतात. राणेंना मारा त्यांच्या पक्षातील लोकांनी राणेंवर शिवीगाळ केली तेवढी त्यांना जास्त बक्षीस, त्यांना वावा, ते आम्हाला मारायलाच आले होते तिघांपैकी एकाला हे मी नेशनल टीव्हीवर सांगतोय. एका आमदाराला ते बोललेत की तिघांपैकी एकाला जीवानिशी मारा. हे मी ऑन केमेरा सांगतोय. कंगना राणावत काहीतरी बोलली तीच घर पडलं. रवी आणि नवनीत रांणा काहीतरी बोलले तर त्यांना जेल मध्ये नेलं. कुठला तरी नेव्हीचा ऑफिसर त्याचा डोळा फोडून टाकला. ठाकरेंच्या काळात पत्रकारांना पण स्वातंत्र्य नव्हतं कोणताही प्रश्न विचारायचं. कोणी पोस्ट टाकत होता त्याला शिवसैनिकांनी मारला. राणे साहेबांसारखे शिवसैनिक होते म्ह्णून ठाकरे घडले. बाळासाहेब आमचे आहेत आणि आमचेच राहणार दैवत आहेत ते. त्यांच्याकडे बोलणारे अवघे दोघेतिघे आहेत. ठाकरे विरुद्ध राणे हि ठाकरे यांनी ठरवलेली पोलिसी आहे. राणेंची नाही”

हे ही वाचा:

“आदिवासी भागातील PESA कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक”; Cm Eknath Shinde यांची ग्वाही

Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss