spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मी उद्धव ठाकरेंसोबत काम करताना त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेऊन नव्हतो: मंत्री उदय सामंत

मी उद्धव ठाकरेंसोबत काम करताना त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेऊन नव्हतो. मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुणे जिल्ह्यातील तळेगावात बोलत असताना “मी उद्धव ठाकरेंसोबत काम करताना त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेऊन नव्हतो. मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो,” असं वक्तव्य केलं आहे.

त्यांनी आज पुण्यातील तळेगाव एमआयडीसीला भेट दिली. या एमआयडीसीची पाहणी केली. फॉक्सकॉन वेदांता कंपनीचा प्रोजेक्ट याच ठिकाणी होणार होता. मात्र तो प्रोजेक्ट गुजरातला हलवण्यात आला. त्यावरुन राज्यभरात राजकारण पेटलं होतं. त्याच ठिकाणची पाहणी करुन दुसरा प्रोजेक्ट कसा आणता येईल याचा विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याच बरोबर त्यांनी बऱ्याच मुद्यांवर चर्चा केली .

त्यांनी सांगितले “आज मी काही धोरणात्मक निर्णय घेतोय. फॉक्सकॉन वेदांता ज्या जागेवर होणार होता, तेथील मी पाहणी ही केली. त्या ठिकाणची काही जागा ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये तर काही जागा अधिग्रहित करणं बाकी आहे. ती जागा अधिग्रहण करण्याचा निर्णय आज घेणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करणार आहे. पण यासाठी नियम बनवणार आहे. जी दोन हजार एकर जागा अधिग्रहित जाणार आहे. त्यात आधी ज्या शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे, त्यांची जागा संपादित केली जाईल. मग प्राधान्याने त्यांना त्या जागेची रक्कम दिली जाईल. त्यानंतर गुंतवणूकदार किती आणि शेतकरी किती याची छाननी केली जाईल”

फॉक्सकॉन वेदांताच्या विषयावर ते बोलले कि “आजचा धोरणात्मक निर्णय ही त्याच अनुषंगाने आहे. एखादी कंपनी इथे येणार असेल तर त्यांना सुविधा ही देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मी पाहणी केली आहे. पुढच्या प्रकल्पाच्या दृष्टीने हा दौरा केला आहे.”

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विषयावर त्यांनी सांगितले कि “रोहित पवारांच्या बोलण्यात तथ्य आहे की नाही मला माहित नाही. पण चार दिवसांपूर्वी मीच म्हणालो होतो की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा ते बारा आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात आहेत, ते योग्यवेळी त्यांचा निर्णय घेतील.”

 

हेही वाचा : 

ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या उर्मिला मातोंडकर, दीपाली सय्यद गेल्या कुठे?

Ajit Pawar : राज्यातील विविध प्रश्नासंबंधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss