नारायण राणे लोकसभेला उमेदवार असल्यास मी प्रचार करणार, दिपक केसरकर

नारायण राणे लोकसभेला उमेदवार असल्यास मी प्रचार करणार, दिपक केसरकर

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाला वेग आला आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील केसरकर आणि राणे वाद महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा नाही. नारायण राणे (Narayan Rane) आणि राणे पुत्रांकडून सध्या मंत्री असलेले मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर सातत्याने पातळी सोडून टीका करण्यात आली आहे. त्यांना मंत्री दीपक केसरकर यांच्याकडूनही केसरकर स्टाईलने वेळोवेळी त्यांना उत्तर देण्यात आली आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) पाडल्यानंतर शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनीही शिंदे गटात सामील होत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis government) मंत्री झाले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने राज्यात युतीचे घोषणा करत अंतर्गत वादाला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला होता.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी केलेल्या एका वक्तव्याकरुन राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालीय. आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांचा स्वतः प्रचार करून त्यांना निवडून आणणार असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. एकेकाळी कट्टर राणे विरोधक अणाऱ्या दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू आहे. मंत्री केसरकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर आपण नारायण राणेंचा आदराने उल्लेख करतो असं देखील केसरकर म्हणाले. कोकणात दहशतवाद असा नेहमी उल्लेख करणारे आणि लोकसभेला नारायण राणेंच्या पुत्राला आपणच पाडलं असं ठणकावून सांगणाऱ्या दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नारायण राणे यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा माझा वैयक्तिक वाद नाही. राजकीय वाद हे तात्पुरते असतात, आणि आमच्यातील वाद हे मिटलेले आहेत. त्यामुळे आता आमचा जिल्हा शांत आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाची युती भक्कम असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांना भाजपकडून जर उमेदवारी मिळत असेल तर भाजपचा उमेदवार म्हणून मी त्यांचा प्रचार करणार आहे.

हे ही वाचा:

उर्फी जावेदच्या तक्रारीनंतर महिला आयोगाचे पोलिस आयुक्तांना आदेश

नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version