spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मी मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार; ऋतूजा लटके यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेचे अंधेरी पूर्व मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर राजकारणात मोठा बदल झाला आहे. शिवसेना फुटीनंतर दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे.तर आता पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सध्या सुरू असलेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आता, निवडणूक लढणार तर मशाल या निवडणूक चिन्हावरच लढणार असून माझ्यावर कोणताही दबाव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. यावर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता स्वतः ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्यावर कोणताही दबाव नाही. आमची जी निष्ठा आहे ती उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटली नाही. असंही त्या म्हणाल्या आहेत. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी निवडणूक लढले तर मशाल चिन्हावर लढेल. बाकी कोणत्या चिन्हावर लढणार नाही. माझे पती रमेश लटके यांची आणि माझी निष्ठा ठाकरे साहेब यांच्यावर आहे. मी आजही आयुक्तांना विनंती करून आजच्या आज राजीनामा मिळवा अशी विनंती करणार आहे. निवडणूक लढली तर ती फक्त मशाल या चिन्हवरच लढणार आहे.

अंधेरी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर जाहीर झाला आहे. या ठिकाणचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी आता उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांचा महापालिकेतील सेवेचा राजीनामा जाणूनबुझून मंजूर केला जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यामागे शिंदे गटाचं षडयंत्र असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पुण्यात महिलांनी भरलेल्या बसला आग; खाजगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ऋतुजा लटकेंच्या अडचणीत वाढ; राजीनामा स्वीकारण्यास १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता

Shivsena Uddhav Balasaheb thackeray : ‘कोणत्याही दबावाला ऋतुजा लटके बळी पडणार नाही’ ; अनिल परब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss