… मला राजकारणात यायला आवडले नसते; राज ठाकरेंच्या पुत्राचे खळबळजनक वक्तव्य

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक विधान केले आहे. आणि सध्या या विधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (Maharashtra Navnirman Sena youth leader Amit Thackeray) यांनी राजकारणाबाबत एक खळबळजनक भाष्य केले आहे.

… मला राजकारणात यायला आवडले नसते; राज ठाकरेंच्या पुत्राचे खळबळजनक वक्तव्य

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक विधान केले आहे. आणि सध्या या विधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (Maharashtra Navnirman Sena youth leader Amit Thackeray) यांनी राजकारणाबाबत एक खळबळजनक भाष्य केले आहे. मी जर राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात (Politics News) आलो नसतो असे अमित ठाकरे म्हणाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते तथा राज ठाकरे यांचे पुत्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन अमित ठाकरे हे जनमानसात मिसळत आहे, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत आहे.

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते पदावर असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष देखील आहे. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहून मी राजकारणात आलो नसतो असे विधान केल्याने मनसेच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अमित ठाकरे हे सध्याच्या राजकारणाला कंटाळले आहे का ? मनसेला संघर्ष करूनही यश मिळत नाही म्हणून कंटाळले आहे का ? अशा विविध चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी देखील सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त करत राजकारणाचा दर्जा घसरत चाललाय अशी खंत व्यक्त केली होती. त्यात आता राज ठाकरे यांचे पुत्र युवा नेते अमित ठाकरे यांनी राजकारणात आलो नसतो असे मत व्यक्त केले आहे.

अमित ठाकरे हे नव्या पिढितील नेते असल्याने युवा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. त्यातच अमित ठाकरे यांनी मी राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामागील कारण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे, सध्याच्या राजकारण बघून मला राजकारणात यायला आवडले नसते असे एकंदरीत त्यांचा बोलण्याचा सुर होता. अमित ठाकरे हे ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे यांच्या नंतर राजकारणात आलेले तरुण नेते आहेत. युवा पिढीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याबद्दल मोठी क्रेझ आहे.

हे ही वाचा :

सामन्यांच्या खिशाला फटका; एसटीचा प्रवास महागणार

तुम्ही तरुणांची मने दूषित करत आहात, सुप्रीम कोर्टाने एकता कपूरला फटकारले

Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version